Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण
rohit sharmayandex

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण

IND vs AUS, 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.

आता शूक्रवारी एक गुड न्यूज समोर आली आहे. रोहितची पत्नी रितिकाने मुलाला जम्न दिला आहे. रोहित आणि रितिका दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत.

रोहित शर्माने शनिवारी (१६ नोव्हेंबर) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली. रोहितने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केलीये. ही गुड न्यूज आल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, रोहित ऑस्ट्रेलियाची फ्लाईट पकडून भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो. मात्र याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण
IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

रोहित पहिला कसोटी सामना खेळणार?

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका सुत्राने म्हटले की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळणार नाही. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलंय की, रोहितला काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायचा आहे. त्याला मुलासह आपल्या पत्नीचीही काळजी घ्यायची आहे. बीसीसीआयलाही त्याचं म्हणणं पटलंय. त्यामुळे बीसीसीआयनेही त्याच्या निर्णयाचा आदर केला आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण
IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

रोहितने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे बीसीसीआयलाही माहीत होतं की, रोहित पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिला कसोटी सामना रोहितशिवाय खेळावा लागणार आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण
IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्म सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com