India vs Australia, KL Rahul Injury: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २२ नोव्हेंबरपासून मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. हा सामना भारतीय संघ आणि भारतीय अ संघातील खेळाडूंमध्ये सुरु आहे. दरम्यान या सामन्यात फलंदाजी करत असताना, केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल फलंदाजीला आला असताना, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू राहुलच्या कोपरला जाऊन लागला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर जावं लागलं.
त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन आणखी वाढलं आहे. कारण रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीला येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र जर केएल राहुल पूर्णपणे फिट होऊ शकला नाही, तर जयस्वालसोबत डावाची सुरुवात कोण होणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
भारतीय संघात सलामीवीर फलंदाज म्हणून अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात सलामीला फलंदाजी करताना तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
त्यामुळे त्याला सलामीला संधी मिळणं कठीण आहे. केएल राहुलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलचं खेळणं हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) , आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.