IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Virat Kohli News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी इंट्रा स्क्वाड सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली फ्लॉप ठरला आहे.
virat kohli
virat kohlitwitter
Published On

IND vs IND A Intra Squad Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत ५ कसोटी सामने रंगणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा कसून सराव सुरु आहे.

सरावाचाच एक भाग म्हणून, भारतीय खेळाडूंमध्ये इंट्रास्क्वाड सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली २ वेळेस फलंदाजीला आला. मात्र दोन्ही वेळेस त्याला स्वस्तात माघारी परतावं लागलं.

मुकेश कुमारने घेतली विकेट

इंट्रा स्क्वाड सराव सामन्यात फलंदाजी करताना विराट चांगल्याच टचमध्ये दिसून येत होता. मात्र मुकेश कुमारने गोलंदाजीला येताच, पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केलं. यावेळी तो १५ धावा करत माघारी परतला.

त्याने काही वेळ नेट्समध्ये जाऊन सराव केला आणि पुन्हा फलंदाजीला आला. मात्र दुसऱ्यांदा फलंदाजीला येऊनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्यांदा फलदाजी करताना तो ३० धावा करत माघारी परतला. त्यामुळे एका डावात दोनदा फलंदाजीला येऊनही त्याला अवघ्या ४५ धावा करता आल्या.

virat kohli
IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

विराटची बॅट चालणं गरजेचं

विराट कोहली हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहे. भारतीय संघाला जर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवायचं असेल, तर विराटला मैदानावर थांबावच लागेल. विराटचा या मालिकेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना १३५२ धावा केल्या आहेत. वर्तमान भारतीय संघात विराट हा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

virat kohli
IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) , आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com