पुढच्या आठवड्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. २२ तारखेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र या सिरीजपूर्वी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागल्याचं दिसून येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे ३ खेळाडू जखमी आहेत.
ऑस्ट्रेलिया विरूद्धची सिरीज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला दुखापत झाल्याची शक्यता आहे. The Sydney Morning Herald या ऑस्ट्रेलियन मीडियाने एक बातमी जाहीर केलीये. या बातमीमध्ये नमूद केल्यानुसार, भारताचा स्टार फलंदाज विराट याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. कारण, तो हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी गेला होता. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन काहीसं वाढलं आहे.
२२ नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टेस्ट खेळवण्यात येणार असून कर्णधार रोहित शर्मा या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. रोहित वैयक्तिक कारणामुळे अजूनही भारतात आहे. अशावेळी तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होणार आहे. अशात टीमची जबाबदारी अनुभवी खेळाडू विराटवर आहे.
दरम्यान केवळ विराट कोहली नाही तर अजून टीम इंडियाचे २ खेळाडू जखमी झाल्याची माहिती आहे. सरफराज खान आणि केएल राहुल या दोन खेळाडूंना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. प्रॅक्टिस करताना बाऊन्सर चेंडू राहुलच्या कोपऱ्यावर आदळला आणि त्याला वेदनेमुळे मैदान सोडावं लागलं. फिजिओच्या प्राथमिक उपचारानंतर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला नाईलाजाने मैदानाबाहेर जावे लागले.
तर दुसरीकडे गुरुवारी प्रॅक्टिस सेशनवेळी फलंदाजी करताना फलंदाज सरफराज खानला दुखापत झाली. सरफराजच्या कोपराला ही दुखापत झाल्याचं समोर आलंय. परंतु यावेळी त्याला एमआरआयची आवश्यकता नव्हती. त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाचे ३ खेळाडू जमखी झाल्याची माहिती आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.