Nandkumar Joshi
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये ५ सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. २२ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सकडे आहे.
रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स सध्याच्या घडीला सर्वात श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत आहेत. या दोघांच्या घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहेत.
रोहित शर्माचा आलिशान फ्लॅट मुंबईतील वरळी परिसरात आहे. पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत रोहित तिथे राहतो.
रोहितचा हा फ्लॅट २९ व्या मजल्यावर आहे. हे घर त्याने २०१५ मध्ये खरेदी केला होता. सहा हजार स्क्वेअर फूट एरिया असलेल्या या घराची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचं घर इस्टर्न सिडनीमध्ये आहे. या लक्झरी घरात ५ बेडरूम, लांबलचक बॅकयार्ड, स्विमिंग पूल यांसारख्या सुविधा आहेत.
पॅट कमिन्सने हे आलिशान घर २०२१ मध्ये खरेदी केलं होतं. या घराची किंमत अंदाजे ९.५ मिलियन डॉलर म्हणजेच ८० कोटी रुपयांच्या आसपास आहे.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसह वनडे वर्ल्डकपही जिंकला आहे.