Rohit Sharma and Ritika Sajdeh blessed with baby boy : भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या घरी आनंदाची बातमी आली. रोहित शर्माच्या घरी ज्युनिअर हिटमॅनचं आगमन झाल्याचं वृत्त आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याची पत्नी रितिकाने (Ritika sharma) मुलाला जन्म दिला आहे. रोहित शर्मा अथवा रितिका यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार, १५ नोव्हेंबर रोजी रोहित शर्मा आणि रितिका दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
रोहित आणि रितिका यांचे हे दुसरे अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांना मुलगी झाली होती. समायरा पुढील महिन्यात सहा वर्षांची होईल. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह २०१५ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर रितिकाने मुलीला जन्म दला होता. आता पुन्हा एकदा शर्मा कुटुंबाच्या घरी छोट्या पाहुण्यांचं आगमन झालेय. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, रितिकाने मुलाला जन्म दिलाय.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे होणार आहे. रोहित शर्माने वैयक्तिक कारण सांगून पहिल्या कसोटीमधून माघार घेतली होती. त्यावेळी रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार, असल्याचे वृत्त समोर आले होते. रोहित शर्माने पालकत्व रजा घेतल्याचं बोललं जात होते. रोहित आता दुसऱ्यांदा वडील झाला आहे. अशा परिस्थितीत त्याची टीम इंडियामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्मा २२ नोव्हेंबरच्या आधी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. भारताला २२ नोव्हेंबर पासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. मात्र आता रोहित पहिला कसोटी सामना खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं पत्रकार परिषदेत रोहितच्या अनुपलब्धतेबाबत वक्तव्य केले होते. रोहित शर्मा पहिल्या कसोटीला असेल की नाही, याबाबत स्पष्ट असे काही बोलला नव्हता. योग्य वेळेत सर्वांना रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार की नाही, याबाबत माहिती दिली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण रोहित शर्मा पर्थ कसोटीत सहभागी झाला नाही, तर संघाची धुरा जसप्रीत बुमराहकडे राहू शकते. जसप्रती बुरमहा टीम इंडियाचा उपकर्णधार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.