Ind Vs Aus google
Sports

IND Vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात, कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह सामना?

India Vs Australia T-20 Series Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे सामने कधी अन् कुठे लाइव्ह पाहू शकता, जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका २५ ऑक्टोबर रोजी संपली. ही मालिका टीम इंडियाने २- १ अशी गमावली. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारत सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल.सूर्यकुमार यादव या संघाचे नेतृत्व करेल. टीम इंडियाने ऑगस्ट २०२३ पासून एकही टी-२० मालिका हरलेली नाही. आता ऑस्ट्रेलियामध्ये ही विजयी मालिका कायम ठेवण्याची संधी भारताकडे असेल. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन या ठिकाणी खेळवली जाणार आहे. पहिला टी-२० सामना २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल. सर्व टी-२० सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता सुरू होतील. तर टॉस दुपारी १:१५ वाजता होईल. जर तुम्हाला टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट पहायचे असेल तर सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तुम्ही मोबाईलवर JioHotstar अॅप किंवा वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० वेळापत्रक

पहिला टी२० सामना - २९ ऑक्टोबर, कॅनबेरा

दुसरा टी२० सामना - ३१ ऑक्टोबर, मेलबर्न

तिसरा टी२० सामना - २ नोव्हेंबर, होबार्ट

चौथा टी२० सामना - ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट

पाचवा टी२० सामना - ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन

टी-२० मालिकेसाठी संघ

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , अर्शदीप सिंग, संदीप सिंग, संजुषन, कुलदीप सिंह, संजु सॅमसन. (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर

ऑस्ट्रेलिया संघ:

मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट (सामने १-३), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने ३-५), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (सामने ४-५), नॅथन एलिस, जोश हेझलवूड (सामने १-२), ग्लेन मॅक्सवेल (सामने ३-५), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकिपर), मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅडम झांपा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

SCROLL FOR NEXT