ind vs aus twitter
Sports

IND vs AUS 5th Test: भारत- ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

India vs Australia 5th Test Match Timings: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला केव्हा सुरुवात होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पराभवासह भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे.

मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. चौथा सामना समाप्त झाल्यानंतर आता पाचवा कसोटी सामना सुरु व्हायला अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरु होणार? जाणून घ्या.

सिडनीच्या मैदानावर रंगणार पाचवा कसोटी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चारही कसोटी सामने सुरु होण्याची वेळ वेगवेगळी होती. हे सामने भारतीय वेळेनुसार पहाटे लवकर सुरु होतात. सिडनी कसोटी सामना पाहण्यासाठीही तुम्हाला पहाटे लवकर उठावं लागणार आहे.

सामन्यातील पहिल्या दिवशी सकाळी ४:३० वाजता टॉस होईल. तर सकाळी ५ वाजता सामन्याला सुरुवात होईल. जर पावसामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे सामना सुरु व्हायला उशीर झाला, तर सामना आणखी लवकर सुरु होईल.

हा या मालिकेतील शेवटचा सामना असणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतणार आहेत. या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली होती. हा सामना भारतीय संघाने २९५ धावांनी जिंकला होता.

त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिका १-१ ने बरोबरीत आल्यानंतर मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत समाप्त झाला होता.

आता मेलबर्नमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाकडे १ दशकानंतर ही मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीनेही हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

SCROLL FOR NEXT