भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अखेरचा कसोटी सामना खेळणार नसल्याचं जाहीर केलंय. उद्या म्हणजेच ३ जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच रोहित शर्माने मोठी घोषणा केलीय. रोहितच्या या निर्णयामुळे रोहित शर्मानं निवृत्ती घेणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार बदलला जाणार असल्याचीही चर्चा आहे.
चौथा कसोटी सामना हा रोहित शर्माच्या क्रिकेट करिअरमधील अखेरचा सामना होता असं म्हटलं जात आहे. चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला. दरम्यान रोहितने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नसली तरी ज्याप्रकारे परिस्थिती निर्माण होतेय त्यावरून या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेईल असे वाटत आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा सिडनी कसोटी सामन्यात खेळणार नाहीये. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह संघाची जबाबदारी संभाळणार आहे. बुमराहने या कसोटी मालिकेच्या आधीही कर्णधारपदाची जबाबादारी संभाळलीय. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते त्यावेळी संघाने विजय मिळवला होता. आता अखेरच्या सामन्यातही तो कर्णधारपद संभाळणार आहे. पण आता त्याच्यावर मालिकेला ड्रा करण्याचा दबाव असेल .
रोहित शर्माने खराब कामगिरीमुळे स्वतःला वगळले आहे की त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाहीये? असं प्रश्न केले जात आहेत. दरम्यान संघात स्थान नसल्याने त्याने असा निर्णय घेतला किंवा टीममध्ये सुरू असलेल्या वादामुळे (रिपोर्टनुसार) असा निर्णय घेतला. या गोष्टी अजून उघड व्हायच्या आहेत. एका वृत्तानुसार, राहुल-यशस्वी पाचव्या कसोटी सामन्यात सलामीला येणार आहेत, तर आकाशदीपच्या जागी प्रसिध कृष्णाला संघात आणण्यात आले आहे, तर रोहित शर्माने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळलाय.
३७ वर्षीय रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेट करिअरची सुरुवात ६ नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ईडन गार्डन येथे झाली. तेव्हापासून त्याने भारतासाठी ६७ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. या कालावधीत त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके केली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या २१२ धावा होती.
रोहित शर्माने २४ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. यादरम्यामन भारताने १२ सामने जिंकले, ९ सामने गमावले आणि ३ सामने अनिर्णित राहिलेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची विजयाची टक्केवारी ही ५७.१४ होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.