India Vs Australia 4th Test, Virat Kohli, Shubman Gill/BCCI-Twitter  Saam TV
Sports

India Vs Australia 4th Test: विराट-जडेजा मैदानात टिच्चून उभे; टीम इंडियावरील धोका अजून टळलेला नाही! कारण...

ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या डावानंतर शुभमन गिल (१२८ धावा) च्या शतकाच्या जोरावर भारतानं ३ बाद २८९ धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं असून, तो मैदानात पाय रोवून उभा आहे.

Nandkumar Joshi

India Vs Australia 4th Test: बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तिसऱ्या दिवसांचा खेळ संपला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या डावानंतर शुभमन गिल (१२८ धावा) च्या शतकाच्या जोरावर भारतानं ३ बाद २८९ धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं अर्धशतक केलं असून, तो मैदानात पाय रोवून उभा आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलिया संघाकडे अद्यापही १९१ धावांची आघाडी आहे. आता भारताला ही आघाडी मोडून ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर नेण्याची नामी संधी आहे.

दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे आणि दोन्ही संघांना फलंदाजी करायची आहे. अशावेळी हा सामना अनिर्णित राहील अशी दाट शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विराट कोहली नाबाद ५९ आणि रवींद्र जडेजा नाबाद १६ धावांवर खेळत होते.

शुभमन गिलनं केली ऑस्ट्रेलियाची बत्ती गूल

युवा फलंदाज शुभमन गिल यानं फलंदाजीची परिपक्वता दाखवून दिली. त्यानं शतक झळकावलं. सर्व फॉरमॅटमध्ये सुस्साट खेळ करत असलेला गिल यानं ऑस्ट्रेलियाची बत्ती गूल केली. त्यानं १२८ धावा केल्या. त्यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

कसोटीतील हे त्याचे दुसरे शतक आहे. त्याने कर्णधार रोहित शर्मा (३५ धावा) याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची, तर चेतेश्वर पुजारा (४२ धावा) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचली.

रोहित शर्मा स्वस्तात माघारी

भारतानं पहिल्या सत्रात रोहित शर्माची विकेट गमावली. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या करण्याची संधी त्याने गमावली. त्याला फिरकीपटू मॅथ्यू कुहेनमन याने बाद केले. रोहित सुरुवातीला चांगले फटके खेळत होता. चांगली लय पकडली होती. त्याने मिशेल स्टार्कच्या चेंडूवर पूल लगावत षटकारही खेचला होता.

रोहित ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू बाद होण्यासारखा नव्हता. रोहितला शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. मैदानात कोणत्याही दिशेला टोलवू शकला असता. पण बॅकफूटवर जाऊन खेळणं महागात पडलं आणि मार्नश लाबुशेनला तो सोपा झेल देऊन माघारी परतला.

पुजारा देखील मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरला. टी ब्रेकच्या थोडा वेळ आधी त्याला टॉड मर्फीनं बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाला दुसरं यश मिळवून दिलं. पुजारानं डीआरएस घेतला पण निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT