Virat Kohli: अनुष्का वहिनींचा पायगुण विराटसाठी ठरलाय लकी! स्वतःच केला खुलासा- VIDEO

नुकताच विराटने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला आहे.
Anushka Sharma Virat Kohli
Anushka Sharma Virat KohliSaam TV

Virat Kohli on anushka sharma: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

अनेक विक्रम आपल्या नावे करणारा विराट गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करताना दिसून येतोय. गेली २-३ वर्षे तो धावा करतानाही संघर्ष करताना दिसून येत आहे.

नुकताच त्याने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला आहे. (Latest sports updates)

Anushka Sharma Virat Kohli
Rohit sharma: नाद करा पण आमचा कुठं! नडत असलेल्या स्टार्कला हिटमॅनने वाजवला खणखणीत षटकार -VIDEO

विराट कोहलीने म्हटले की, जेव्हा माझ्या वडिंलाचे निधन झाले होते, त्यानंतर माझा आयुष्याकडे पाहन्याहा दृष्टीकोन बदलला होता. मात्र माझे आयुष्य बदलले नव्हते. आयुष्य आधीसारखेच होते. मला आयुष्यात काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित झाले. मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त झालो. मात्र माझ्या आयुष्यात आणि आजूबाजूंच्या गोष्टींमध्ये कुठलाच फरक जाणवला नव्हता.'

तर अनुष्का शर्माची भेट हा आयुष्यातील लाईफ चेंजिंग मुमेंट असल्याचं विराटने म्हटले आहे. विराट आणि अनुष्का हे दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

Anushka Sharma Virat Kohli
IND VS AUS 4th test: हिटमॅन इज बॅक! जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; तेच करत हिटमॅनने रचला इतिहास

अनुष्काची भेट लाईफ चेंजिंग मुंमेंट..

'माझ्यासाठी अनुष्काची भेट हा लाईफ चेंजिंग मुमेंट आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्यात बदल व्हायला सुरुवात होते. कारण तुम्हा दोघांना एकत्र पुढे जायचं असतं. त्यावेळी तुम्हाला काही गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे हाच माझ्या आयुष्यातील लाईफ चेंजिंग मुमेंट आहे.'असे विराटने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com