ind vs aus twitter
Sports

Ind vs Aus Match Timings: भारत - ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ पुन्हा बदलली! किती वाजता सुरू होणार सामना?

India vs Australia 3rd Test Timings: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये रंगणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

मालिका जिंकण्याच्या दृष्टीने तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये रंगणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.

आतापर्यंत या मालिकेतील २ सामने खेळले गेले आहेत. पर्थमध्ये पार पडलेला सामना हा भारतीय वेळेनुसार, सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुरू झाला होता. त्यानंतर ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी सामना पार पडला होता.

हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू झाला. आता तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ५:५० मिनिटांनी सुरू होणार आहे. तर टॉस ५ :२० ला होईल.

गाबाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना गती आणि उसळी मिळते.

मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबामध्ये रंगणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. यासह हा सामना तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. सध्या दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.

भारत - ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ

नाणेफेक - सकाळी ५:२०

पहिला सेशन - सकाळी ५:५० ते ७:५०

लंच -४० मिनिटे

दुसरा सेशन - सकाळी ८:३० ते १०:३०

टी - २० मिनिटे

तिसरा सेशन - सकाळी १०:५० ते १२:५०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT