IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ ची घोषणा! घातक गोलंदाज करतोय कमबॅक

Australia Playing XI For IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असले्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.
IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ ची घोषणा! घातक गोलंदाज करतोय कमबॅक
australia cricket teamtwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ मध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे.

या सामन्यात जोश हेजलवूड कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर स्कॉट बोलँडला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागणार आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हेझलवूडला दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं होतं.

स्कॉट बोलँड हा दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज ठरला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. मात्र तरीसुद्धा त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमिन्सन हेझलवूडच्या कमबॅकबाबत बोलताना म्हटले की, 'जोश परतला आहे. त्याला आता कुठलाही त्रास नाही. काल त्याने चांगली गोलंदाजी केली..'

IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ ची घोषणा! घातक गोलंदाज करतोय कमबॅक
Ind vs Aus Test : हा प्लान सक्सेस झाला तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी टीम इंडियाचीच!

बॉर्डर- गावसकर मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक केलं आणि भारतावर १० गडी राखून शानदार विजय मिळवला. सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका ही १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून गाबाच्या मैदानावर रंगणार आहे.

IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ ची घोषणा! घातक गोलंदाज करतोय कमबॅक
Ind vs Aus 3rd Test : रोहित शर्मा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं घडलं तरी काय?

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिच मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड

IND vs AUS: तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ ची घोषणा! घातक गोलंदाज करतोय कमबॅक
IND vs AUS: 'गाबा'ची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी? गोलंदाज की फलंदाज; कोण चमकणार?

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com