ind vs aus twitter
Sports

IND vs AUS: 'गाबा'ची खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी? गोलंदाज की फलंदाज; कोण चमकणार?

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कशी खेळपट्टी? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत २९५ धावांनी विजयाची नोंद केली होती.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.

आता मालिकेतील तिसरा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. केवळ मालिका जिंकण्याच्या दृष्टीने नव्हे, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गाबाच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. गाबाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते.

त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळेल आणि चेडूं स्विंग होईल. सुरुवातीची काही षटकं ही फलंदाजांना खेळून काढणं खूप कठीण असेल.

या मैदानावर कसा राहिलाय रेकॉर्ड?

या मैदानावर आतापर्यंत ६८ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान २६ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर २७ सामने प्रथम गोलदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. गाबाची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी आव्हानात्मक असणार आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी करणं हे भारतीय फलंदाजांसाठी .खरी कसोटी असणार आहे.

हा सामना सकाळी लवकर सुरु होईल. तर भारतीय फॅन्सला हा सामना पाहण्यासाठी पहाटेच उठावं लागणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT