
पुरुषांच्या अंडर 19 आशिया चषक क्रिकेट सामन्याचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा बांगलादेशाला मिळाले आहे. रविवारी दुबई येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशाच्या संघाने भारतीय टीमचा 59 धावांनी पराभव केला. त्यामुळे नवव्या वेळी विजेतेपद मिळवण्याचं भारताचं स्वप्न भंग झालं आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत आत्तापर्यंत 8 वेळा विजेतेपद मिळालं असल्याने सर्वात यशस्वी संघ मानला जातो.
आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेशने ४९.१ षटकांत १९८ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात मोहम्मद अमनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ३५.२ षटकांत १३९ धावांवर आटोपला. बांगलादेशने गेल्या वर्षी अंतिम फेरीत यूएईचा पराभव केला होता.
भारताकडून कर्णधार अमनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत चौकाराच्या माध्यमातून 26 धावा केल्या. १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. तर बांगलादेशकडून इक्बाल हुसेन इमोन आणि कर्णधार अझीझुल हकीमने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. भारताचा अर्धा संघ मात्र ७३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
आजच्या खेळात पाच भारतीय खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही, त्याचा फायदा बांगलादेशाच्या संघाला झालेला दिसला. भारताकडून कर्णधार मोहम्मद अमानने सर्वाधिक 26 धावा केल्या. तर बांगलादेशकडून रिझान हुसेनने 47 आणि शिहाब जेम्सने 40 धावा केल्या. दरम्यान, भारतीय संघाने मोहम्मद अमनच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेला पराभूत करत स्पर्धेच्या ११ व्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर उपांत्य फेरीत बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केले होते.
2023 मध्ये देखील अंडर-19 आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशने भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 188 धावांवर ऑलआऊट झाला होता. तर प्रत्युत्तरात बांगलादेशने 42.5 मध्ये 189 धावा करून विजय मिळवला होता.
अंडर-19 आशिया कपचा यंदा हा 11 वा मोसम आहे. ज्यात भारतीय संघाने 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तानने ट्रॉफी शेअर केली होती. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी प्रत्येकी एकदा हे विजेतेपद पटकावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.