India vs Australia 3rd ODI shubman gill and shardul thakur may rest in rajkot odi says reports  SAAM TV
क्रीडा

IND vs AUS, Playing 11: राजकोट वनडेसाठी टीम इंडियात होणार मोठे बदल! शुबमन गिलसह हा प्रमुख खेळाडू राहणार बाहेर

Ankush Dhavre

India vs Australia 3rd ODI:

राजकोटच्या मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना रंगणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे.

आता तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय संघ क्लिनस्वीप करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

इंडियन एक्स्रप्रेसच्या वृत्तानुसार, तिसऱ्या वनडे सामन्यासाठी फॉर्मात असलेल्या शुबमन गिलला आणि शार्दुल ठाकुरला विश्रांती दिली जाणार आहे. हे दोघेही तिसऱ्या वनडेसाठी राजकोटला जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

हा सामना झाल्यानंतर हे दोघेही थेट गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीत भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सराव सामना इंग्लंड संघाविरूद्ध रंगणार आहे.

इंदुर कसोटीत झळकावलंय शतक..

इंदुरच्या मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात शुबमन गिलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत शतक झळकावलं आहे.

त्याने ९७ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ६ वे आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धचे पहिलेच शतक ठरले आहे.(Latest sports updates)

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होणार बदल..

दुसरा वनडे सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची बातमी समोर आली होती. या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती.आता तिसऱ्या वनडेत तो कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्याला शार्दूल ठाकुरच्या जागी संधी दिली जाऊ शकते. तर कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि विराट कोहली या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11)

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT