Gold in Asian Games : भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण'वेध, भारताच्या खात्यात पहिलं सुवर्णपदक

India Win Gold Medal in Asian Games 2022 : ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रुद्रांकेश पाटील आणि दिव्यांश सिंग या त्रिकुटाने देशासाठी सुवर्णपदक पटकावले.
Asian Games 2023
Asian Games 2023 Saam TV
Published On

Asian Games 2022 :

चीन येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताचं सुवर्ण पदकाचं खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भारताची सुरुवात चांगली झाली. नेमबाजांनी यावेळी टीम इंडियाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रुद्रांकेश पाटील आणि दिव्यांश सिंग या त्रिकुटाने देशासाठी सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकली आहेत. पहिल्या दिवशी एकूण 5 पदके मिळाली. सुवर्णपाठोपाठ भारताने दुसऱ्या दिवशीही कांस्यपदक पटकावले. (Latest Marathi News)

Asian Games 2023
IND vs AUS 2nd ODI Match: शानदार, जबरदस्त! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, वनडे मालिकाही खिशात

भारतासाठी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत तीन नेमबाजांनी भाग घेतला. यामध्ये दिव्यांश, ऐश्वर्या प्रताप आणि रुद्रांकेश यांनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. या तिघांनी तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत आघाडी कायम राखली.

चौथ्या फेरीत दिव्यांश 104.7, रुद्रांकेश 105.5 आणि तोमर 105.7 ने आघाडीवर होते. पाचव्या आणि सहाव्या फेरीतही त्यांनी ही कामगिरी कायम ठेवली. भारतीय नेमबाजांनी विश्वविक्रम मोडत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. (Sports News)

Asian Games 2023
Viral Cricket Video: जिंकलस भावा! अम्पायरने आऊट दिलेल्या फलंदाजाला परत बोलावलं; बांगलादेशच्या लिटन दासचं होतंय कौतुक

भारताने चीनला 1893.7 गुणांसह मागे टाकले. चीनचे 1893.3 गुण होते. कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 1890.1 गुण आहेत. चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे 1888.2 गुण आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com