Viral Cricket Video: जिंकलस भावा! अम्पायरने आऊट दिलेल्या फलंदाजाला परत बोलावलं; बांगलादेशच्या लिटन दासचं होतंय कौतुक

Ish Sodhi Mankading, Watch Full Video: लिटन दासचं सध्या जोरदार कौतुक होत आहे.
viral cricket video ish sodhi mankading runout umpire gave out but liton das calls him back ban vs nz 2nd odi match
viral cricket video ish sodhi mankading runout umpire gave out but liton das calls him back ban vs nz 2nd odi matchTwitter
Published On

Ish Sodhi Mankading, Watch Full Video:

क्रिकेटमध्ये अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केलं तर फलंदाजाला माघारी परताव लागतं. हा निर्णय केवळ तिसरा अंपायर बदलू शकतो. मात्र तिसऱ्या अंपायरने बाद घोषित केलं तर फलंदाजाला माघारी जावच लागतं.

दरम्यान बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात आगळा वेगळा प्रसंग पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

viral cricket video ish sodhi mankading runout umpire gave out but liton das calls him back ban vs nz 2nd odi match
IND vs AUS, 2nd ODI: इंदुर वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह बाहेर; मोठं कारण आलं समोर

तर झाले असे की, बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यातील ४६ वे षटक सुरू होते. त्यावेळी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमुद गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा फलंदाज ईश सोढी नॉन स्ट्राईकवर होता.

गोलंदाजी करत असताना हसन महमुदने त्याला मांकडींग करत धाव बादची अपील केली. अंपायरने या निर्णयाला तिसऱ्या अंपायरकडे पाठवलं. डीआरएसमध्ये स्पष्ट दिसून येत होतं की, ईश सोढी क्रिझच्या बाहेर आहे.

त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केलं. ईश सोढी मैदान सोडून बाहेर जात होता इतक्यात सौम्य सरकार आणि कर्णधार लिटन दासने अंपायर्ससोबत चर्चा करून त्याला परत बोलावलं.

बांगलादेशी कर्णधारावर कौतुकाचा वर्षाव..

ईश सोढीला बाद झाल्यानंतरही परत बोलवल्यामुळे बांगलादेशचा कर्णधार लिटन दासवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा पराभवा झाला असला तरीदेखील लिटन दासने आपल्या कृत्याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

ज्यावेळी ईश सोढी धावबाद झाला त्यावेळी तो अवघ्या १७ धावांवर फलंदाजी करत होता. या डावात त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात बांगलादेश संघाला ८६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ४१.१ षटकात २५४ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ १६८ धावा करता आल्या. या सामन्यात ३९ धावांची खेळी करणाऱ्या ईश सोढीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com