IND vs AUS 2nd ODI Match: शानदार, जबरदस्त! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, वनडे मालिकाही खिशात

IND vs AUS 2nd ODI Match: भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.
IND vs AUS 2nd ODI Match
IND vs AUS 2nd ODI MatchSaam tv
Published On

India vs Australia Match News:

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन वनडे मालिकेचा दुसरा सामना इंदूरच्या होल्कर स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात टीम इंडियाच्या शुबमन गिल, अय्यर आणि सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत ४०० धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यास ऑस्टेलिया संघ सपशेल अपयशी ठरला. यामुळे भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाने दिलेल्या ४०० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर पावसामुळे एक तासासाठी खेळ थांबविण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला ३३ षटकात ३१७ धावांचं आव्हान देण्यात आलं.

IND vs AUS 2nd ODI Match
IND vs AUS, 2nd ODI: भारताच्या वाघांसमोर कांगारू ढेर;अय्यर- गिलचं झंझावाती शतक

डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या ऑस्ट्रेलिया संघाची पडझड पुढेही कायम राहिली. भारताचा फिरकीपटू आर. आश्विनच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज सहज फसला. आश्विनने मार्नस लाबुशेनला त्रिफळाचीत केले. लाबुशेनने ३१ चेंडूत २७ धावा कुटल्या. वॉर्नर आणि लाबुशेनने तिसऱ्या गडीसाठी ८० धावांची भागीदारी रचली.

आश्विनने १५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूत डेव्हिड वॉर्नर आणि पाचव्या चेंडूत जॉशला बाद केले. वॉर्नरने ३९ धावा कुटल्या तर जॉशनं ६ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ६ वा झटका एलेक्सच्या रुपाने बसला. त्याने १२ चेंडूत १४ धावा कुटल्या.

कॅमरून ग्रीनही अवघ्या १९ धावांवर बाद झाला. कॅमरूनने १३ चेंडूत १८ धावा कुटल्या. रविंद्र जडेजानेही एडम जाम्पाला बाद केलं. सीएनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही. मालिकेचा दुसरा सामना टीम इंडियाने ९९ धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com