rohit sharma twitter/bcci
Sports

IND vs AUS: डे - नाईट कसोटीत ३ नव्या खेळाडूंना संधी मिळणार! काय असेल टीम इंडियाचा मास्टरप्लान?

India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सुनील गावसकरांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. हा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा कमबॅक करताना दिसून येणार आहे. तो पहिल्या कसोटीत खेळताना दिसून आला नव्हता. तर दुखापतग्रस्त झालेला गिल देखील या सामन्यातून कमबॅक करताना दिसेल.

सुनील गावसकरांच्या मते भारतीय संघात बदल होणार हे निश्चित आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल संघात परतल्यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडीक्कलला बसावं लागेल. यासह फलंदाजी क्रमातही बदल पाहायला मिळू शकतात.

रोहित शर्मा संघात नसताना, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली होती. सुनील गावसकरांच्या मते केएल राहुल पुढील सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

काय म्हणाले सुनील गावसकर?

सुनील गावसकर म्हणाले, ' माझ्या मते संघात २ बदल नक्कीच होतील. रोहित शर्मा आणि शुभमन गिल प्लेइंग ११ मध्ये येणार आणि ते आल्यानंतर फलंदाजी क्रमात बदल होणार. रोहित केएल राहुलची जागा घेणार.

तसेच गिल पडीक्कलच्या जागी फलंदाजी करेल. पडीक्कल आणि जुरेल प्लेइंग ११ मधून बाहेर होतील. तर राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावं लागेल.'

यासह त्यांचं म्हणणं आहे की, दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रविंद्र जडेजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत दहीहंडी उत्सवात मनसेचे बॅनर झळकले

SCROLL FOR NEXT