jasprit bumrah saam tv
क्रीडा

IND vs IRE: कॅप्टन बनताच बुमराहला मोठा धक्का; आयर्लंड दौऱ्यातून दिग्गजाने घेतली माघार

India vs Ireland: या दौऱ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

IND vs IRE T20I Series:

वेस्टइंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील सामने १८,२० आणि २३ ऑगस्ट रोजी रंगणार आहेत.

या दौऱ्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. तर आगामी आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप पाहता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह कोचिंग स्टाफमधील सदस्यांना देखील विश्रांती दिली जाणार आहे.

त्यामुळे असं म्हटलं जात होतं की, या दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली जाऊ शकते. मात्र माध्यमातील वृत्तानुसार व्हीव्हीएस लक्ष्मण देखील या दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला मुख्य प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफशिवाय आयर्लंड दौऱ्यावर जावं लागणार आहे.

भारतीय संघ गेल्यावेळी जेव्हा आयर्लंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मणने मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. मात्र यावेळी तो आयर्लंड दौऱ्यावर जाणार नसल्याचं म्हटलं जा आहे. त्याच्या अनुपस्थितीत सितांशू कोटक आणि साईराज बहुतुले यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला जाऊ शकतो. (Latest sports updates)

आयर्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

टी -२० मालिकेचे वेळापत्रक..

पहिला सामना - १८ ऑगस्ट, मालाहाइड

दुसरा सामना - २० ऑगस्ट, मालाहाइड

तिसरा सामना -२३ ऑगस्ट, मालाहाइड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: मुंबईचा विश्वासू खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात! लागली ११.२५ कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: 26 नोव्हेंबरनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार

KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; KL Rahulवर या संघाने लावली मोठी बोली

Balaji Kinikar News : माझ्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेला, आमदार बालाजी किणीकरांनी व्यक्त केली भावना

IPL 2025 Mega Auction: लॉस झाला ना भावा! स्टार्कला मिळाली ५० टक्क्याहून कमी रक्कम; कोणत्या संघाने लावली बोली?

SCROLL FOR NEXT