IND vs WI 4TH T20I: चौथ्या टी-२० साठी टीम इंडिया सज्ज! मालिका बरोबरीत आणण्यासाठी हार्दिक प्लेइंग ११ मध्ये करणार 'हा' मोठा बदल

Team India Playing 11 For 4th T20 Match: पाहा कशी असेल चौथ्या टी-० सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११
Indian Cricket Team
Indian Cricket Team Saam Tv
Published On

India vs West Indies 4th T20I: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी -२० सामना फ्लोरिडातील लॉडरहीलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत या मालिकेत भारतीय संघाला एक विजय मिळवता आला आहे. तर २ विजयासह वेस्टइंडीजचा संघ २-१ ने आघाडीवर आहे.

हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.

Indian Cricket Team
Team India News: विश्रांती नव्हे तर 'या' कारणामुळे विराट,रोहित टी-२० क्रिकेट खेळणं टाळताय

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजी आक्रमणात बदल पाहायला मिळू शकतो. हार्दिक पंड्या उमरान मलिक किंवा आवेश खानला संधी देऊ शकतो. या दोघांना संधी मिळाली तर मुकेश कुमार किंवा अर्शदीप सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते.

भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी...

भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांना या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकने आतापर्यंत ८० धावा खर्च करत केवळ ४ गडी बाद केले आहेत. तर अर्शदीप सिंगने ९८ धावा खर्च करत २ गडी बाद केले आहेत. तर मुकेश कुमारने ७८ धावा खर्च करत २ गडी बाद केले आहेत.

तसेच फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज शुबमन गिल पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आशिया चषक आणि वर्ल्डकप तोंडावर असताना त्याला फॉर्म गवसला नाहीये. त्याने ३ सामन्यांमध्ये अवघ्या १६ धावा केल्या आहेत. तर संजू सॅमसनला २३ आणि ईशान किशनला अवघ्या ३३ धावा करता आल्या आहेत. (Latest sports updates)

Indian Cricket Team
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/उमरान मलिक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com