india tour of ireland  saam tv
Sports

India Tour Of Ireland: वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया करणार आयर्लंड दौरा! इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

India vs Ireland: भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

India Tour Of Ireland Full Schedule: आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला ४ मालिका देखील खेळायच्या आहेत.

ज्यात आयर्लंडविरुद्व होणाऱ्या मालिकेचा देखील समावेश आहे. येत्या १२ जुलैपासून भारत -वेस्ट ईंडिज मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेनंतर भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना १८ ऑगस्ट, दुसरा टी-२० सामना २० ऑगस्ट आणि अंतिम टी-२० सामना २३ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सर्व सामन्यांचे आयोजन मालाहाईडमध्ये रंगणार आहेत.

भारत आणि आयर्लंड (India Tour Of Ireland) हे दोन्ही संघ २ वर्षांपूर्वी देखील आमने सामने आले होते. २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २-० ने विजय मिळवला होता. त्यावेळी हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा कर्णधार होता.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ४ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने खिशात घातली होती. (Latest sports updates)

पाहा भारत -आयर्लंड टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक..

पहिला टी-२० सामना - १८ ऑगस्ट, मालाहाईड

दुसरा टी-२० सामना - २० ऑगस्ट, मालाहाईड

तिसरा टी-२० सामना - २३ ऑगस्ट, मालाहाईड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khajur Chutney Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी टेस्टी खजूरची चटणी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: पालघर _ डहाणू दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या तरुणाला चिरडले

Cabinet Expansion : नितीश कुमारांच्या मुलासह ३२ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, टीम 'सम्राट'मध्ये कोण कोण?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

SCROLL FOR NEXT