Team india  Saam tv
Sports

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

India vs south africa : टीम इंडियाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

टीम इंडियाची जादू कायम

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरोधात मिळवला ऐतिहासिक विजय

टीम इंडियाने पाचव्या सामन्यासोबत मालिकाही जिंकली

टीम इंडियाने पुन्हा एकदा जादू सिद्ध केली आहे. टीम इंडियाने टी२० मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका देखील खिशात टाकली आहे. टीम इंडिया मालिका जिंकल्याने दोन महिन्यांनी होणारा विश्वचषकाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी२० सीरीजचा पाचवा सामना आज शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. टीम इंडियाने मालिकेचा पाचव्या सामना ३० धावांनी जिंकला. टीम इंडियाने ३-१ ने मालिकेवर कब्जा मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला २३२ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ८ गडी गमावत फक्त २०१ धावा केल्या. टीम इंडियाने १४ वी टी२० सीरीज जिंकली आहे.

भारताच्या विजयात हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी मोलाची भूमिका निभावली. हार्दिक पंड्याने ६३ धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेचा एक गडी देखील बाद केला. तर तिलक वर्माने ७३ धावा कुटल्या. दुसरीकडे या सामन्यात फिरकीपटू वरुणने चार गडी बाद केले. भारताने यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या सामन्यात हटके विजय मिळवला आहे.

टीम इंडियाने पहिला सामना १०१ धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांनी जिंकला होता. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला. तर चौथा सामना पावसामुळे धुतला गेला होता.

दक्षिण आफ्रिकेसाठी विकेटकिपर फलंदाज क्विंटन डिकॉकने तडाखेबाज फलंदाजी केली. डिकॉकने रीज हेंड्रिक्सच्या साथीने ६९ धावा कुटल्या. दोघांची जोडी वरुण चक्रवर्तीने तोडली. हेड्रिक्स बाद झाल्यानंतर डिकॉकने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. डिकॉक आणि ब्रेविस या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली होती.

भारतासाठी दुसरा विकेट जसप्रीत बुरमारहने घेतला. डिकॉकने ३५ चेंडूत ६५ धावा कुटल्या. यात ९ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तर पंड्याने डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. पुढे वरुण चक्रवर्तीने एडेन मार्करम आणि डोनोवन फरेराला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

SCROLL FOR NEXT