Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

Narendra modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, पडताळणीनंतर व्हायरल दावा असत्य ठरलाय.
narendra modi news
narendra modisaam tv
Published On

पंतप्रधान मोदींनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेजही प्रचंड व्हायरल होतोय...दिल्लीत काहीतरी घडतंय आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय...त्यामुळेच आता चर्चांना आणखी उधाण आलंय...खरंच मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय का...? मोदींच्या राजीनाम्याबद्दल अजून माहिती बाहेर का आलेली नाही...? यामध्ये काय तथ्य आहे हे सांगणं गरजेचं आहे...मोदींनी राजीनामा दिला तर पुढे कोण पंतप्रधान होणार...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय?

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदलल्यानंतर नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा अचानक राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर खुर्चीसाठी शहा आणि योगींमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...याचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने माहिती मिळवली...त्यावेळी सरकारचं अधिकृत पोर्टल PIB फॅक्ट चेकवर माहिती मिळाली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुया.

व्हायरल सत्य काय?

साम इन्व्हिस्टिगेशन

मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलेला नाही

मोदींनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा

दिल्लीत बदल होणार या चर्चेमुळे मेसेज व्हायरल

narendra modi news
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असता तर जगभरात बातमी असती...मात्र, तसं काहीही झालेलं नाही...सोशल मीडियावर काहीही दावे केले जातात...सध्या प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने असे मेसेज वेगानं व्हायरल होतात...त्यामुळे आम्ही अशा व्हायरल मेसेजची पडताळणी करून सत्यता समोर आणतो...आमच्या पडताळणीत मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com