आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने नवीन प्रयोग केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरत आहे. मात्र हा प्रयोग आतापर्यंत फसल्याचे पाहायला मिळाले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रोहित अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली देखील अवघ्या २४ धावा करत माघारी परतला.
सुपर ८ फेरीतील सामन्यांसाठी भारतीय संघाने आपल्या प्लानमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. गेल्या ३ सामन्यांप्रमाणे या सामन्यातही विराट- रोहितची जोडी मैदानावर आली होती. न्यूयॉर्कची खेळपट्टी स्लो होती. त्यामुळे त्या खेळपट्टीवर धावा करणं कठीण होतं. मात्र वेस्टइंडीजमध्ये ही जोडी धावांचा पाऊस पाडणार असं वाटलं होतं. मात्र डावखुऱ्या हाताच्या फजहलक फारुकीने रोहितला आपला जाळ्यात अडकवलं.
रोहित शर्मा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. मात्र डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांसमोर तो संघर्ष करताना दिसून आला आहे. असेच काहीसं चित्र या सामन्यातही पाहायला मिळालं. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांसमोर खेळताना रोहितचा रेकॉर्ड अत्यंत निराशाजनक राहिला आहे. टी-२० क्रिकेटमधील १९ पैकी ८ डावात तो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना बाद झाला आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीची देखील बॅट शांतच आहे. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो २४ चेंडूत २४ धावा करत राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेला सामना हा भारतीय संघासाठी रंगीत तालीम सारखाच होता. कारण २४ जून रोजी भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. त्यापूर्वी २२ जून रोजी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाला हरवायचं असेल रोहित आणि विराटने चांगली सुरुवात करून देणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.