IND vs AFG, 1st Innings: सूर्या - हार्दिकची बॅट तळपली! अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचं आव्हान

IND vs AFG News: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील ४३ वा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे.
सूर्या - हार्दिकची बॅट तळपली! अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचं आव्हान
IND vs AFG, 1st InningsTwitter/BCCI

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील ४३ वा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात विराट - रोहितची जोडी फ्लॉप झाल्यानंतर सूर्या आणि हार्दिकने भारतीय संघाचा डाव सांभाळला. सुरुवातीला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची जादू चालली. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी हल्लाबोल करत संघाची धावसंख्या १८१ धावांवर पोहोचवली. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांची गरज आहे.

केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. तिसऱ्याच षटकात फजहलक फारुकीने भारतीय संघाला मोठा धक्का दिला.

सूर्या - हार्दिकची बॅट तळपली! अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचं आव्हान
David Johnson : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने घेतला जगाचा निरोप; एकाच सामन्यात घेतले होते १० विकेट अन् ठोकलं होतं शतक

कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. यासह पुन्हा एकदा विराट - रोहित सलामीला येण्याचा डाव फसला. दोघांना अवघ्या ११ जोडता आल्या. विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील १०० च्या स्ट्राईक रेटने २४ धावा करत माघारी परतला.

सूर्या - हार्दिकने सांभाळला डाव

सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी दोघांनीही योग्यरीत्या पार पाडली आणि संघाची धावसंख्या १५० पार नेली. दोघांनी मिळून अफगाणिस्तानचं गोलंदाजी आक्रमण फोडून काढलं. सूर्याने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ५३ धावांची खेळी केली. मात्र अर्धशतक साजरं केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद होऊन माघारी परतला. हार्दिक पंड्याने देखील फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. त्याने २४ चेंडूत ३२ धावा केल्या.

सूर्या - हार्दिकची बॅट तळपली! अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचं आव्हान
T-20 World Cup Ad Revenue: IPL च्या तुलनेत T-20 WC फ्लॉप? या ३ कारणांमुळे व्हिव्हरशिपमध्ये २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर,या संघाकडून गोलंदाजी करताना फजहलक फारूकीने ३३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. यासह राशिद खानने देखील ३ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com