David Johnson : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने घेतला जगाचा निरोप; एकाच सामन्यात घेतले होते १० विकेट अन् ठोकलं होतं शतक

former indian cricketer David Johnson : टीम इंडियाचा माजी खेळाडू डेव्हिड जॉन्सन यांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं आहे. डेव्हिड यांनी जीवन संपवल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
cricket
David Johnson Saam tv

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीट करत डेव्हिड यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, वयाच्या ५२ व्या वर्षी डेव्हिड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. चार मजली इमारतीवरुन उडी मारून डेव्हिड यांनी जीवन संपवलं.

कर्नाटकातील डेव्हिड हे गोलंदाज होते. तसेच ते फलंदाजही होते. मीडियम फास्ट गोलंदाज जॉन्सन यांनी टीम इंडियासाठी २ सामने खेळले होते. तसेच त्यांनी ३ गडी बाद केले. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात १० ऑक्टोबर १९९६ साली दिल्लीमध्ये टेस्ट डेब्यू केलं होतं.

cricket
Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती?

जवागल श्रीनाथला दुखापत झाल्याने मिळाली संधी

१९९६ साली ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दिल्लीत टेस्ट सामना खेळताना श्रीनाथला दुखापत झाली होती. यामुळे श्रीनाथच्या ऐवजी डेव्हिड यांना संघात स्थान मिळालं. डेव्हिड जॉन्सनने या टेस्टमध्ये वेंकटेश प्रसादसोबत चांगली गोलंदाजी केली. डेव्हिड यांनी दुसऱ्या डावात सलीमीवीर मायकल स्लेटरला शून्यावर बाद केले होते.

दोनच आंतरराष्ट्रीय सामने खेळले

या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी डेव्हिड यांची निवड झाली. खेळात सातत्य नसल्याने टेस्ट करिअर फक्त २ सामन्यांपूर्ती मर्यादीत राहिलं. त्यांनी दोन सामन्यात ३ गडी बाद केले. तर फर्स्ट क्लास ३९ सामन्यांमध्ये १२५ गडी बाद केले. तर यादी ए च्या ३३ सामन्यांमध्ये ४१ गडी बाद केले.

cricket
Cricketer Death News: क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! भारताच्या स्टार खेळाडूने आत्महत्या करत संपवलं जीवन

एकाच सामन्यात घेतले होते १० विकेट अन् शतकही ठोकलं

डेव्हिड जॉन्सन यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. १९९५-९६ रणजी ट्रॉफीदरम्यान १५२ धावा देऊन १० गडी बाद केले होते. तर नाबाद शतकही ठोकलं होतं. तर शेवटचा सामना २०१५ साली कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये खेळला. जॉन्सन यांनी जगाचा निरोप घेतल्याने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com