India vs pakistan Saam tv
Sports

टी२० वर्ल्डकपमध्ये व्हायव्होल्टेज सामना होणार, टीम इंडिया पाकिस्तान आमनेसामने येणार? महत्वाची अपडेट आली समोर

India vs pakistan : टी२० वर्ल्डकपमध्ये व्हायव्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे. याविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट

आयसीसी, पीसीबी आणि बीसीबीची आज महत्त्वाची बैठक

दोन्ही संघाचा सामना न झाल्यास आर्थिक नुकसान होण्याची भीती

India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना १५ फेब्रुवारी रोजी होणार होता. दोन्ही संघात सामना होणार होता. परंतु १ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी सरकारने भारताविरोधात सामना खेळण्यास नकार दिला होता. परंतु या सामन्याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना होण्याची शक्यता आहे.

आयसीसी, पीसीबी आणि बीसीबीची बैठक आज ८ फेब्रुवारी रोजी होत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना होण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे दोन प्रतिनिधी इमरान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी रविवारी सकाळी लाहोरला पोहोचले होते.

पाकिस्तानने सुरुवातीला बांगलादेशाचं समर्तन करत भारताविरोधात होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देऊन विश्वचषक स्पर्धेत भारतात होणाऱ्या सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यांनी सर्व सामने श्रीलंकेत खेळण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली. त्यानंतर आयसीसीने स्पर्धेत बांगलादेश संघाऐवजी स्कॉटलँडच्या संघाचा समावेश केला.

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिलं. भारत आणि पाकिस्तान सामना न झाल्यास मोठं आर्थिक नुकसान होईल. यामुळे आयोजक आणि स्पर्धेचं नुकसान होईल, असं श्रीलंका बोर्डाचं म्हणणं आहे.

श्रीलंका आणि भारताने मिळून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केलं आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अमेरिका संघाला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने नेदरलँडला पराभूत केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT