radha yadav twitter
क्रीडा

Radha Yadav Catch: ही राधा 'बावरी' नायतर 'सुपरवुमन' हाय! हवेत झेपावत घेतला अफलातून कॅच - VIDEO

Radha Yadav Catch Video: भारतीय महिला संघातील खेळाडू राधा यादवने डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, असा झेल घेतला आहे.

Ankush Dhavre

Best Catch In Womens Cricket: भारतीय महिला संघातील खेळाडू राधा यादव ही महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. हे तिने एकदा नाहीतर अनेकदा सिद्ध केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने अविश्वसनीय झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हवेत झेप घेत घेतला भन्नाट झेल

बीसीसीआय वुमेनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात राधा यादवने हवेत झेप घेत अविश्वसनीय झेल घेतला आहे. ब्रुक हॉलिडेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू हवा तितका लांब गेला नाही.

तर झाले असे की, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून ३२ वे षटक टाकण्यासाठी प्रिया मिश्रा गोलंदाजीला आली.

त्यावेळी हॉलिडेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू उंच हवेत गेला. त्यावेळी राधाने मागच्या दिशेने धावत डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. हा प्रिया मिश्राचा पहिलाच सामना होता. पहिल्याच सामन्यात राधाने घेतलेल्या शानदार झेलमुळे तिला पहिला विकेट मिळाला.

भारताचा पराभव

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिला सामना जिंकलेल्या भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २६० धावा करायच्या होत्या. मात्र हे आव्हान भारतीय फलंदाज पूर्ण करू शकले नाहीत. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahim Constituency : अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,' छत्रपती लढले अन् जिंकले'

Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

VIDEO : उद्धवसेनेला मोठा धक्का, किशनचंद तनवाणी यांनी घेतली माघार; मोठं कारण आलं समोर

Maharashtra News Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले, अजित पवारांसह ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

BJP MLA Ticket Cut: भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा

SCROLL FOR NEXT