Hardik Pandya Catch : हार्दिक पंड्याचा कॅच कमालच, राधा यादवचाही कॅच लय भारी! बघा श्वास रोखायला लावणारे २ VIDEO

radha yadav catch video : सोशल मीडियावर सध्या राधा यादवच्या कॅचची जोरदार चर्चा सुरु आहे. श्वास रोखायला लावणारा तिचा कॅच एकदा पाहाच.
हार्दिक पंड्याचा कॅच कमालच, राधा यादवचाही कॅच लय भारी! बघा श्वास रोखायला लावणारे २ VIDEO
Hardik Pandya Catch :Saam tv
Published On

मुंबई : टी २० क्रिकेट तसा झटपट प्रकार. तडाखेबंद फलंदाजी, चौकार- षटकारांचा पाऊस यामुळं सामना बघायला मजा येते. सुरुवातीला फक्त स्फोटक फलंदाजीमुळं सामना बघायला धमाल यायची. पण आता क्षेत्ररक्षण (फिल्डिंग) आणि अचूक टप्प्यावर खोचक गोलंदाजी, यॉर्कर, बाउंसरचा मारा आणि त्यावर फलंदाजांची उडणारी त्रेधातिरपिट यामुळं सामना अधिकच रंगतदार होतो. असेच काहीसे उत्कंठा वाढवणारे क्षण बुधवारी बांगलादेशविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यात आणि भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्या लढतीदरम्यान बघायला मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्यानं 'सुपरहिट' कॅच घेतला. तर महिलांच्या लढतीत भारतीय संघाच्या राधा यादवनं घेतलेला कॅच तर केवळ अवर्णनीय असाच होता.

बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे यूएईमध्ये टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेला ८२ धावांनी धूळ चारली. भारताच्या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली. दोन्ही सामन्यांत अप्रतिम कॅच बघायला मिळाले. हार्दिक पंड्यानं जबरदस्त कॅच घेतला. तर, तिकडे राधा यादवनंही घेतलेल्या कॅचचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघासमोर २२२ धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आणि त्यांनी दमदार सुरुवात केली. पण आघाडीचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांचा डाव मोडला. ८६ धावांवरच सहा विकेट गमावल्या. १४ व्या षटकात हार्दिक पंड्यानं लक्षवेधी कॅच घेतला. वरुण चक्रवर्तीनं टाकलेला चेंडू रिशाद हुसैननं जोरानं टोलवला. हार्दिक पंड्यानं तर २७ मीटरचं अंतर कापून तो कॅच सहज टिपला.

दुसरीकडे टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघातील राधा यादवनं सुसाट कॅच घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयसीसीनं तर तिनं घेतलेल्या कॅचची तुलना ट्रॅविस हेडने घेतलेल्या एका कॅचसोबत केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू विशमी गुणारत्नेने टोलवला. पण तो चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. तो चेंडू हवेत उडाला. राधा पॉइंटवर उभी होती.

तिनं पाठीमागे वळून धावायला सुरुवात केली. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर होती. अखेरीला चेंडूच्या दिशेने झेपावत तिनं कॅच घेतला. हा कॅच बघून प्रेक्षक तर हैराणच झाले. राधा यादवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हार्दिकने घेतलेल्या कॅचसोबत राधा यादवनं टिपलेल्या झेलची तुलना केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com