Maharashtra News Live Updates : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला, 4 उमेदवारांची शेवटची यादी

Maharashtra Marathi News Live Updates : आज सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, उमेदवारी अर्ज, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Congress Candidate Fourth List : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला, 4 उमेदवारांची शेवटची यादी

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीस्तही आपली शेवटची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूरचा उमेदवार काँग्रेसने बदलला आहे. काँग्रेसने आता कोल्हापूरमधून चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

 Diwali Shopping:  ⁠पुणेकरांना आता दिवाळीची खरेदी रात्री दीड वाजेपर्यंत करता येणार

पुणेकरांना आता दिवाळीची खरेदी रात्री दीड वाजेपर्यंत करता येणार आहे. ⁠रात्री दीड वाजेपर्यंत सर्व प्रकारचे दुकाने दिवाळीनिमित्त सुरू ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलीय. ⁠दिवाळीनिमित्त फटाक्यांची दुकाने रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी फटाका डीलर्स असोसिएशनने केली होती.

Accident:  दौंड तालुक्यात दोन एसटी बसचा अपघात; 40 हुन अधिक प्रवासी जखमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात ४० अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी यवत पोलिस आलेत. वरवंडमधील कवटीचा मळा परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील सुमारे पाच रुग्णवाहिका जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी हजर होत्या. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी एकमेकांना धडकल्यानंतर या एसटी आणि प्रवासी बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. घटनास्थळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जखमींना मदतीसाठी ते संबंधित प्रशासनाला सूचना केल्यात.

Assembly Election:  राष्ट्रीय समाज पक्षाची तिसरी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची तिसरी यादी अधिकृत ३२ उमेदवारांची घोषणा केली. जिंतूरचे उमेदवार डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत हे माजी पोलीस अधीक्षक आहेत. फलटणचे उमेदवार २०१९ भाजप व २०१४ काँग्रेस कडून विधानसभा निवडणूक लढली होती आता तुरुंगात असून राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिली आहे.

Assembly Election:  मित्रपक्षासाठी 4 जागा, बडनेरामध्ये रवी राणांना भाजपचा पाठिंबा

बडनेरामध्ये रवी राणांना भाजपचा पाठिंबा मिळाला आहे. गंगाखेडमध्ये रासपच्या रत्नाकर गुट्टे यांना समर्थन कलिनामध्ये रिपाई आठवले गटाचा उमेदवार शाहूवाडीतून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांना पाठिंबा देण्यात आलाय.

आरमोरीत भाजप उमेदवार कृष्णा गजबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी जनशक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारीचा अर्ज दाखल केला.भारतीय जनता पक्षाने गजबे यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेऊन त्यांना पक्षाची तिकीट देण्यात आली आहे. हजारो कार्यकर्त्यांसह गजबे यांनी आज तहसील कार्यालय देसाईगंज येथे आपला उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार व भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातल्या नऱ्हे परिसरात फटाके फोडल्याने चेंबरमधील गॅसचा स्फोट

नऱ्हेमधल्या एका सोसायटीमध्ये लहान मुलं फटाके फोडत होते. त्यावेळी ड्रेनेज मधल्या गॅसचा स्फोट झाला. घटनेत लहान मुलं जखमी झालेत. पुण्यातील नऱ्हे भागात काल दुपारी ही घटना घडली.

कल्याण पूर्वेत महायुतीत बंडखोरी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी भरला अपक्ष फॉर्म

कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कल्याण पश्चिम मतदार संघावर भाजपने दावा केला होता. कल्याण पश्चिमची जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने भाजपचे माजी आमदार नाराज आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले, अजित पवारांसह ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यातील सर्व अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचे बुलंद आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात गर्जणार आहेत.

नाशिकमध्ये ड्रोन उडतांना खाली पडला, शोध सुरू

ड्रोन नक्की कोण उडवत होत याचा शोध सुरू आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नो फ्लाय झोन मध्ये ड्रोन उडविण्यात आल्याने पोलीस सतर्क झालेत. मुंबई नाका परिसरात ड्रोन उडत होता. वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी ड्रोन ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलिसांना दिला

Maharashtra Election : अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक-२०२४ साठी उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Jalgaon News : जळगावच्या चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला

चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला आहे. राजू तडवी ऐवजी प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाकर सोनवणे यांचा आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला आहे. त्यानंतर त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. याअगोदर राजू तडवी यांच्या नावाची घोषणा झाली होती.

Solapur Politics : सोलापूर शहर उत्तरमधून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात

सोलापूर शहर उत्तरमधून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

विजयकुमार देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भरला उमेदवारी अर्ज

मागच्या 20 वर्षांपासून विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे करत आहेत नेतृत्व

Maharashtra Election : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागा जिंकणार; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा दावा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अवघे काही तास उरले असताना उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज नामांकन प्रक्रियेसाठी स्वतः उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी म्हटले की, उत्तर पश्चिम मुंबईमधील सर्वच्या सर्व सहा जागा महायुतीचे उमेदवार जिंकणार आहेत. यावेळी मालाड विधानसभेतील आमदार असलम शेख यांचा देखील पराभव होणार आहे, त्यांनी केलेली अनधिकृत बांधकामे आणि भ्रष्टाचाराचा विरोधात यावेळी मालाडची जनता आकर्षित झाली असून असलम शेख यांचा देखील पराभव यावेळी निश्चित होणार असल्याचं गोयल यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आज दुसऱ्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रोहित पवारांसोबत त्यांचं कुटुंब देखील उपस्थित होते. तर मोजक्याच कार्यकर्त्यांसह रोहित पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात दाखल झाले होते.

Kopar Pachpakhadi : कोपरी पाचपाखडीत केदार दिघेंनी उमेदवारी अर्ज सादर केला

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत राजन विचारे उपस्थित होते.

Vasant Deshmukh : जयश्री थोरात वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : वसंत देशमुख यांना जामीन मंजूर

जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना जामीन मंजूर

संगमनेर न्यायालयाने केला जामीन मंजूर

काल पुण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती.

धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याव केलं होत बेताल वक्तव्य

शरद पवार फोडणार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ

शरद पवार फोडणार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ

युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या कण्हेरी मारुती =पासून होणार

सकाळी ९ वाजता फोडला जाणार प्रचाराचा नारळ

शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा राहणार उपस्थितीत

आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर उद्या युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते

चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी; भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

चंदगड विधानसभा मतदारसंघात अखेर बंडखोरी

भाजप नेते शिवाजी पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन करत शिवाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

माजी राज्यमंत्री भरमु पाटील आणि कन्या शिवानी शिंगाडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

चंदगडमधील रवळनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन शिवाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शिवाजी पाटील यांच्या समर्थकांच्या घोषणेने चंदगड दुमदुमले

चंदगड मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील तर महाविकास आघाडी कडून नंदा बाभुळकर यांची उमेदवारी

शिवाजी पाटील यांच्या बंडखोरीने चंदगड मध्ये महायुतीत उभी फूट

ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला

ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच हेदेखील उपस्थित होते.

सुनील राऊत यांच्या समोर शिंदेंना उभे राहू द्या शिवसेना काय आहे समजेल - संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटाचे विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास खासदार संजय राऊत ही सोबत आले होते. या वेळी त्यांनी सुनील राऊत यांच्या विजयाचा निर्धार बोलून दाखवला.

मुंबईमधील १०० टक्के जिंकून येणारी जागा सुनील राऊत यांची आहे. त्यांच्या समोर एकनाथ शिंदेंनी उभे राहू द्या, शिवसेना काय आहे त्यांना अनुभव घेऊ द्या, असं संजय राऊत म्हणाले.

नागपुरात अनीस अहमद यांच्याकडून काँग्रेसला धक्का

काँग्रेस नेते, माजी मंत्री, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव अनीस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार?

राजगृह मुंबई येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते अनीस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.

मध्य नागपुरात काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्याने होते नाराज

अस्लम शेख यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

१६२-मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अस्लम शेख यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मालाड मार्वे रोड येथून हजारो कार्यकर्त्यांच्या रॅली सह शक्ती प्रदर्शन करत असलम शेख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राजू शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार; क्रांती चौकातून निघाली भव्य रॅली

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राजू शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली निघाली आहे. या रॅलीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरे सहभागी झाले आहेत. क्रांती चौकातून ही रॅली निघत आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते सहभागी झाले आहेत.

अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादीच्या उमेदवार सना मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी वडील नवाब मलिक आणि बहीण निलोफर मलिक या उपस्थित होत्या.

विद्यमान आमदार चेतन तुपे आज उमेदवारी अर्ज भरणार

- हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यमान आमदार चेतन तुपे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल - रॅली काढत चेतन तुपे अर्ज भरण्यासाठी दाखल

- ⁠चेतन तुपे यांच्याबरोबर महायुतीचे स्थानिक नेते देखील उपस्थित

अजित पवार यांचा बारामतीमध्ये 75 हजार मतांनी पराभव होईल‌

Maharashtra Marathi News Live Updates : अजित पवार यांच्या डोक्यावरील‌ हात काकांनी काढला आहे. आता तर ते बारामतीत आले आहेत. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा सुमारे 75 हजार मतांनी पराभव होईल असा दावा माळशिरसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी केला आहे.

Maharashtra Marathi News Live Updates : मागाठाणे विधानसभेत विजयाची हॅट्रिक नक्की होणारं, प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार प्रकाश सुर्वे हे मुंबईच्या मागाठाने विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रकाश सुर्वे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयापासून अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरुवात केली यापूर्वी घरी त्यांच्या पत्नीकडून त्यांना औक्षण करण्यात आले. विविध धर्मगुरूंचे आशीर्वाद घेऊन आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या नामांकन अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरुवात केली केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे देखील त्यांच्या नामांकन अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. शिंदे साहेबांनी जनतेसाठी राबवलेल्या विविध योजनांचा फायदा यावेळी होणार असून मोठ्या मातादीक्याने माघाटनेतील जनता निवडून देईल आमची विजयाची हॅट्रिक नक्की होईल असे देखील प्रकाश सुर्वे यावेळी बोलताना म्हणाले

Maharashtra Marathi News Live Updates :  छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूककोंडी

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन तासांपासून सगळीकडे वाहतूककोंडी झाली आहे. क्रांती चौकातील चारही बाजूची वाहतूक बंद केली आहे. त्यासोबतच वेगळ्या ठिकाणी रॅलीमुळे कार्यकर्ते मोटारसायकल स्वार रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आज प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळेच उमेदवार शक्ती प्रदर्शन करताना शहरातून रॅली काढत आहेत. त्याच वेळी शहरातील नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे.

Maharashtra News Live Updates : पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार दोघेही आमचेच असल्याचं मिश्किल वक्तव्य पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे.

Maharashtra Marathi News Live Updates :  गणेश नाईक यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐरोली मतदारसंघात भव्य रॅली काढत मोठा शक्ती प्रदर्शन करत गणेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती संदर्भात कोणालाही तक्रार करणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेय. यासोबतच नवी मुंबई शहरात जात धर्म हे काही चालत नसून ज्याच्यावर जानता विश्वास ठेवेल तो विजयी होईल अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी व्यक्त केलेय.

Maharashtra Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंना अमित ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मी निवडणुकीला तयार आहे. बकीच्याबाबत मला माहित नाही. कोण फॉर्म मागे घेणार याबाबत माहीत नाही. मी माझा व्हिजन घेऊन पुढे जाणार आहे. आदित्य ठाकरे यांनाही माझ्याकडून शुभेच्या...
अमित ठाकरे, मनसे नेता

Maharashtra Marathi News Live Updates : अजित पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pune News : अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. चंद्रकांत दादांना पाठिंबा देणार आहे.  चंद्रकांत पाटलांनी अमोल बालवडकर यांना पेढा भरवत त्यांची समजूत काढली व नाराजी दूर केली. 

Maharashtra News Live Updates : भाजपा माजी खासदार डॉ हिना गावितांनी अक्कलकुवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. हिना गवितानी एक अपक्ष तर एक भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला

महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शक्ती प्रदर्शन

महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. ठाकरे गटाच्या उमेदवर स्नेहल जगताप जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची महाडमध्ये सभा होणार आहे. महाड शहरात रॅली काढत स्नेहल जगताप यांचे शक्ती प्रदर्शन

विश्वास वळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला

पालघर - बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . बोईसरच्या राम मंदिरात दर्शन घेऊन विश्वास वळवी यांच्या रॅलीला सुरुवात झाली असून यावेळी महाविकास आघाडी कडून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं . बैलगाडी, आदिवासी पारंपारिक तारपा वाद्य , तसंच ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली . माझ्या समोरील दोन्ही उमेदवार हे यापूर्वी आमदार राहिले असून त्यांच्यावर मतदारांची असलेली नाराजी यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विश्वास वळवी यांनी व्यक्त केला . तर आपण निवडून आल्यास सर्वप्रथम आरोग्य विभाग सुदृढ करण्यावर भर देणार असल्याचे वळवी यावेळी म्हणाले.

विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

सांगलीच्या कडेगाव मधून विश्वजीत कदम यांनी आपल्या कुटुंबासमवेत आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. आज विश्वजीत कदम कडेगाव मध्ये भव्य अशी रॅली काढत आहेत. तत्पूर्वी त्यांनी हा अर्ज आपल्या कुटुंबासमवेत भरला आहे..

कुडाळमधून निलेश राणेंनी उमेदवारी अर्ज भरला

कुडाळ मालवण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही मोठे शकतीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत खासदार नारायण राणे, दिपक केसरकर, रवींद्र चव्हाण नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमच्या सोबत जनता आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या सोबत असतो त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. या मातीने आम्हाला खूप काही दिलेय त्यामुळे ह्या मातीचे ऋण आम्ही विसरू शकत नाही. मला ह्या मातीतच काम करायचे आहे. माझं काम लोकांना पटत असेल तर लोक मला मोठ्या मटधिक्क्याने निवडून देतील असा आशावाद यावेळी निलेश राणे यांनी व्यक्त केलाय

Maharashtra News Live Updates : देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या रॅलीत सहभागी

छ. संभाजीनगरमधील ९ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग

आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी आजचा सकाळचा मुहूर्त साधलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर, पैठण गंगापूर आणि फुलंब्री शहरात आज सर्व पक्षाचे मोठं शक्ती प्रदर्शन दिसणार आहे.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट शक्ती प्रदर्शन करत करणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उबाठाचे पैठण मतदार संघाचे उमेदवार दत्ता गोर्डे हे सकाळी १० वाजता रॅली काढून पैठणमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर सभाही घेणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नुकतेच ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार अतुल सावे शक्तिप्रदर्शन करीत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

फुलंब्री मतदारसंघात भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण संभाजीनगर शहरातील केम्ब्रिज चौकातून रॅली काढणार आहेत रॅली काढत ते छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियमच्या परिसरात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

फुलंब्री मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे हेही सिडको चौकातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज करण्यासाठी हेमलता पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

- काँग्रेसच्या हेमलता पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक मध्यमधून करतात उमेदवारी अर्ज दाखल

- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हेमलता पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या

- तर भाजपचे बंडखोर शशिकांत जाधव देखील नाशिक पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले

हसन मुश्रीफ कागल मतदारसंघातून विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महायुतीचे नेते, अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ कागल मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. त्यांची भव्य रॅली कागल इथल्या शिवाजी चौक परिसरातून सुरू झालेली आहे...

Maharashtra Marathi News Live Updates : काँग्रेसकडूने उमेदवारी नाकारलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कानडेंचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश...

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश...

श्रीरामपूर विधानसभेत लहू कानडे यांना अजित पवार गटाची उमेदवारी

आमच्या कठीण काळात अजित दादांनी आम्हाला साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे. मला आनंद आहे की माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली. आज मी तिच्यासाठी आलो आहे. मी उद्या अर्ज भरणार, त्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील.
नवाब मलिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे कोपरी पाचपखाडी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यानिमित्ताने आज वागळे इस्टेट ते किसान नगर अशी भव्य मिरवणूक करण्यात येणार आहे.. या मिरवणुकीत अनेक महिला या मुख्यमंत्र्यांचे औक्षण करतील त्यासोबतच महाराष्ट्रातील साधुसंतांचे वंशज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभ आशीर्वाद देणार आहेत.

Maharashtra News Live Updates : युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

युगेंद्र पवार
युगेंद्र पवारयुगेंद्र पवार

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार बापूसाहेब पठारे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पालघर - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत . पालघरच्या केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीच इंजिन फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत . मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशिराने . वंदे भारत एक्सप्रेस देखील पालघर रेल्वे स्थानकावर अडकली . मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अडकल्या .

Maharashtra Marathi News Live Updates :  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अर्ज दाखल करणार

अजित पवारांचा नेता शरद पवारांच्या गटात

बारामती : दौंड येथील अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झाला.

Maharashtra Marathi News Live Updates :  मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरला, वरळीत तिरंगी लढत

सोलापूर दक्षिणच्या जागेवरून शिवसेना - काँग्रेस वाद पोहचला शिगेला..

सोलापूर दक्षिणच्या जागेवरून शिवसेना - काँग्रेस वाद पोहचला शिगेला..

शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसला दिला थेट इशारा

काँग्रेसला सांगली पॅटर्न महागात पडणार,काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीत बिघाडी होईल असं कुठलही कृत्य करू नका

वसुबारसचा मुहूर्त साधत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा सर्वपक्षीय उमेदवारांचा धडाका

Maharashtra Marathi News Live Updates :  अमरावतीत पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ वाद पेटला,अडसूळ आणि राणा देणार एकमेकांविरुद्ध उमेदवार

दर्यापूर मतदार संघामध्ये माहायुती कडून शिंदे गटाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केल्यावर आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना आपल्या पक्षात घेत युवा स्वाभिमान पक्षातर्फे आज त्यांचा दर्यापूर मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे,

Maharashtra Marathi News Live Updates :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला..

रमेश थोरात यांच्याकडून होतेय दौंड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांची केली मागणी..

काल पत्रकार परिषद घेत रमेश थोरात यांनी मागितली होती शरद पवारांची जाहीर माफी...

पवार साहेब घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, पवार साहेब जो उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करू : रमेश थोरात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com