BJP MLA Ticket Cut: भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा

Maharashtra Assembly Election 2024: भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली असून यात विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत. कोणते आहेत हे आमदार, जाणून घ्या...
भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा
Chandrashekhar Bawankule and Devendra FadnavisSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली असून या यादीत २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्याच्या यादीमध्ये काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत.

यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांची उमेदवारी कापून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक राहिलेले सुमित वानखडे यांना जाहीर झाली आहे. तसेच मध्य नागपूर येथून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची तिकीट कापून विधान परिषदेच्या आमदार प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा
BJP 3rd Candidate List : राम सातपुते यांना अखेर उमेदवारी! भाजपची तिसरी यादी आली, कुणाला मिळाली संधी?

याशिवाय काटोल विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. तर काटोलमधून इच्छुक असलेले भाजप नेते आशिष देशमुख यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा काणे विरुद्ध आशिष देशमुख हे मैदानात असणार आहेत.

मोर्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष तथा अजित पवार गटांना समर्थक दिलेलं देवेंद्र भुयार यांच्या विरुद्ध भाजपचे उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसचे विद्यमान पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा
BJP 3rd Candidate List : राम सातपुते यांना अखेर उमेदवारी! भाजपची तिसरी यादी आली, कुणाला मिळाली संधी?

काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदार संघामध्ये माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने साकोली विधानसभा मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com