pooja vastrakar twitter
Sports

Viral Video: अंदाज चुकला,फटका फसला; मोठा फटका खेळण्याच्या नादात एलिसा हेलीची दांडी गुल,Video

Pooja Vastrakar Bowling Video: भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकरने असा काही चेंडू टाकला एलिसा हेलीला कळालाच नाही. काही कळायच्या आत ती क्लीन बोल्ड होऊन माघारी परतली.

Ankush Dhavre

Pooja Vastrakar Clean Bowled Alyssa Healy:

सध्या ऑस्ट्रेलियाचा महिला संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गोलंदाजी करताना भारताची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकरने असा काही चेंडू टाकला एलिसा हेलीला कळालाच नाही. काही कळायच्या आत ती क्लीन बोल्ड होऊन माघारी परतली.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने चेंडू पूजा वस्त्राकरकडे सोपवला. तिने दहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची दांडी गुल केली. पूजाने टाकलेल्या चेंडूवर एलिसा हेलीने स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू थेट यष्टी उडवत निघून गेला. यासह कर्णधार एलिसा हेली १३ धावांवर माघारी परतली. तर भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली. (Latest sports updates)

भारताचा सलग दुसरा पराभव

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना लिचफिल्डने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तर एलसा पेरीने ५० आणि अलाना किंगने सर्वाधिक २८ धावांची खेळ केली.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २५५ धावा करता आल्या. भारतीय संघाला हा सामना केवळ ३ धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान या पराभवासह भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Colour Saree: श्रावणातल्या खास सणासुदींसाठी नेसा ही पिवळ्या रंगाची आकर्षक साडी

Maharashtra Live News Update : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीका

सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती?|What Is The Best Time To Wake Up in the Morning

Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

SCROLL FOR NEXT