IND vs ZIM 4th T20I  Saam Digital
क्रीडा

IND vs ZIM 4th T20I: झिम्बाब्वे 'हरारे'! जयस्वाल-गिलचा 'यशस्वी' तडाखा; भारताचा 10 विकेट्सनं विजयी दणका! मालिकाही जिंकली

Sandeep Gawade

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात १० गडी राखून टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेवरही कब्जा केला आहे. ५ सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो यशस्वी जैयस्वाल ठरला आहे. त्याने तुफान फटकेबाजी करत ९३ धावांचं योगदान दिलं.

टीम इंडियाचा कर्णधार शुभमल गिलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. खलील अहमद हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 32 धावांच्या बदल्यात २ गडी बाद केले. तर तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी 1 एक गडी बाद केला.

153 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. त्यामुळे भारतीय संघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य अगदी सहज गाठल. यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी केली आणि शुभमन गिलने त्याला पूर्ण साथ दिली. जयस्वालने 53 चेंडूत नाबाद 93 धावा केल्या. त्याने 13 चौकार आणि 2 षटकार ठाकले. गिलने 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 58 धावांच योगदान दिलं.

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्याची सुरुवात खराब झाली. संघाला पहिल्याच सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पहिल्या सामन्यात भारतीय संघ 102 धावांवर ऑलआऊट झाला होता. मात्र यानंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

Maharashtra News Live Updates: वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे याचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Nashik Tourist Places : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

SCROLL FOR NEXT