shubman gill  twitter
Sports

IND vs ZIM,3rd T20I: इथंच सामना फिरला.. शुभमन गिलने सांगितला भारत- झिम्बाब्वे सामन्यातील टर्निंग पॉईंट

India vs Zimbabwe, Shubman Gill Statement: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने भारतीय संघाच्या विजयातील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २३ धावांनी विजय मिळवला आणि या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १८२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १५९ धावा करता आल्या.

सामन्यानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' हा सामना आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता. ज्या पद्धतीने आम्ही गोलंदाजीत आणि फलंदाजीत सुरुवात केली, ते शानदार होतं. खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता. त्यामुळे मोठे फटके खेळणं कठीण जात होतं ' असं गिल म्हणाला. गेल्या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत २३४ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात भारतीय संघाला १८२ धावा करता आल्या.

काय म्हणाला शुभमन गिल?

सामन्यानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' आम्ही लेंथवर गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात होतो. आम्हा सर्वांना माहीत होतं की, जर खेळपट्टीतून मदत मिळत असेल तर हे गोलादाजांसाठी फायदेशीर आहे.' दरम्यान भारतीय संघाकडून १५ धावा खर्च करत ३ गडी बाद करणारा वॉशिंग्टन सुंदर या विजयाचा हिरो ठरला.

तसेच सामनावीर ठरलेला वॉशिंग्टन सुंदर म्हणाला की, ' खरं सांगू तर खूप बरं वाटतंय. ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी खूप चांगली होती. यापूर्वीही दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजांना मदत मिळाली आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावा केल्या. झिम्बाब्वे संघाला या धावांचा पाठलाग करताना १५९ धावा करत आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT