VIrat Kohli  Saam TV
Sports

Virat Kohli Century : वेस्ट इंडिजविरुद्ध विराटचा धमाका! 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात झळकावलं शतक, सचिनलाही टाकलं मागे

Sports News : विराट त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 वा सामना खेळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराटने शतक ठोकत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने कसोटी कारकिर्दीतील 29वे शतक साजरे केले. विराटचे तिन्ही फॉरमॅटमध्ये हे 76 वे शतक आहे.

विराट कोहली त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 वा सामना खेळत आहे. आपल्या 500 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या नावे 76 शतके आहेत. तर सचिनच्या नावे 75 शतके आहेत. रिकी पाँटिंगच्या नावे 68 आणि जॅक कॅलिसच्या नावे 500 सामन्यात 60 शतके आहेत.

500 व्या सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या

विराटसाठी हे शतकही खास आहे. हा टप्पा गाठणारा तो भारताचा चौथा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहावा क्रिकेटपटू आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (664), महेला जयवर्धने (652), कुमार संगकारा (594), सनथ जयसूर्या (586), रिकी पाँटिंग (560), महेंद्रसिंग धोनी (538), शाहिद आफ्रिदी (524), जॅक कॅलिस (519) आणि राहुल द्रविडने (५०९) हा टप्पा गाठला आहे.

विराटला वगळलं तर आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कुणीही 50 हून जास्त धावा करु शकलेलं नाही. अशी कामगिरी करणारा विराट हा पहिलाच खेळाडू आहे. विराटपूर्वी ५००व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता, ज्याने 48 धावांची खेळी केली होती.  (Latest sports updates)

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतकं

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. या बाबतीत ते सुनील गावस्कर यांच्या मागे आहेत. गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके झळकावली आहेत. कोहलीने 12 शतके झळकावली आहेत. तर कॅलिसनेही 12 शतके झळकावली आहेत. डिव्हिलियर्सने 11 शतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raisins Health Benefits: मनुके आरोग्यासाठी फायदेशीर, पण 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत!

हिवाळ्याच्या दिवसांत मूड का खराब होतो? त्यामागील वैज्ञानिक कारण काय?

Grandson property rights: आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा जन्मसिद्ध हक्क नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Furniture Cleaning Tips: फर्निचर स्वच्छ कसा करायचा? 5 सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या साफसफाईचा कचरा वाढला! पुण्यात रोज ३ हजार टन कचरा; महापालिकेवर अतिरिक्त ताण

SCROLL FOR NEXT