World Cup 2023: नाद करा पण आमचा कुठं! IND vs PAK सामन्यासाठी हॉटेल्स महागले; जुगाडूंनी हॉस्पिटलमधील खाटाच बुक केल्या

IND vs PAK Match: या सामन्याची घोषणा होताच, अहमदाबादच्या हॉटेल्सचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले आहे.
ind vs pak
ind vs pak saam tv
Published On: 

ICC ODI World Cup 2023 IND vs PAK Match: आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची घोषणा होताच, अहमदाबादच्या हॉटेल्सचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले आहे.

ind vs pak
IND vs WI 2nd Test: जयस्वालची 'यशस्वी' घोडदौड सुरूच! दुसऱ्याच इनिंगमध्ये तोडला गब्बरचा 'हा' मोठा रेकॉर्ड

अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी १ लाखाहून अधिक लोक सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. भारत -पाकिस्तान सामना पाहण्यासाठी केवळ दोन्ही देशातील नव्हे तर परदेशातील क्रिकेट चाहते देखील गर्दी करू शकतात.

या संधीचा फायदा घेऊन अहमदाबादच्या हॉटेल मालकांनी हॉटेल्स बुकिंगचे दर वाढवले आहेत. हे दर लाखोंच्या घरात पोहोचले आहेत. आता सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी अनोखी शक्कल लढवल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

ind vs pak
IND vs WI 2nd Test: हिटमॅन इज बॅक! दुसऱ्या कसोटीत रोहितने रचला इतिहास; असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

हॉटेल्सऐवजी हॉस्पिटलच्या बुकिंगमध्ये वाढ..

अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, 'सामन्यावेळी हॉटेलचे दर ५० हजारांच्या पुढे असणार आहे. तर हॉस्पिटलमध्ये १-२ दिवस मुक्कामाला राहण्यासाठी केवळ ३ ते २५ हजार रुपये खर्च करावे लागतात. हे दर हॉटेल्सच्या दारांपेक्षा कितितरी पटीने कमी आहे. एका खाजगी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पसार शाह यांनी म्हटले की, 'हे हॉस्पिटल आहे, त्यामुळे ते बॉडी चेकअप करून रात्रभर मुक्कामाला राहू देण्याची मागणी करत आहेत. बॉडी चेकअपसह त्यांचा एका रात्रीचा मुक्कामही होईल आणि त्यांचे कितीतरी पैसे वाचतील.'

तसेच डॉ. निखिल लाल यांनी म्हटले की, 'आमच्याकडे बॉडी चेकअपचे पॅकेजेस आहेत. त्यामुळे आमच्याकडे १५ ऑक्टोबर रोजी २४ ते ४८ तासांसाठी राहण्याची चौकशी केली जात आहे.' भारत -पाकिस्तान सामन्याचा क्रेझ हा वेगळ्याच लेव्हलला पोहोचला आहे. त्यामुळे चाहते हा सामना पाहता यावा म्हणून भन्नाट जुगाड करताना दिसून येत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत ३ वेळा पाकिस्तानचा सामना करणार आहे. आशिया चषकस्पर्धेला येत्या ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.