Furniture Cleaning Tips: फर्निचर स्वच्छ कसा करायचा? 5 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

फर्निचर

घरातील फर्निचर हे आपल्या घराच्या सौंदर्यात भर घालते. परंतु, सततचा वापर, हवेतील धूळ आणि अस्वच्छतेमुळे फर्निचरची चमक कमी होते आणि ते खराब दिसते.

Furniture

फर्निचर स्वच्छ करायच्या सोप्या टिप्स

बाजारात मिळणारी महागडी रसायने वापरण्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनी तुम्ही तुमचे फर्निचर अगदी सहज स्वच्छ करू शकता.

Furniture Cleaning Tips

व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल

एका वाटीमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल व्यवस्थित मिक्स करा. आता एक मऊ कापड या घोळात बुडवून त्याने फर्निचर हलक्या हाताने पुसून घ्या. व्हिनेगर फर्निचरवरील धूळ आणि जंतू काढून टाकण्यास मदत करते, तर ऑइल लाकडाला सुंदर चमक देतो.

Natural Wood Polish

बेकिंग सोडा पेस्ट

जर फर्निचरवर खूप जुने किंवा हट्टी डाग असतील, तर पाण्यात बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट एका कापडाने डाग असलेल्या भागावर लावा आणि थोडावेळ ठेवून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. यामुळे डाग नाहीसे होतात.

For Stubborn Stains

लिंबाचा रस

एका स्वच्छ कापडावर थोडा लिंबाचा रस घेऊन त्याने फर्निचरचे पृष्ठभाग पुसून घ्या. लिंबामध्ये असणारे नॅशनल ॲसिड फर्निचरवरील चिकटपणा आणि घाण स्वच्छ करण्यास उत्तम मदत करते तसेच घरात छान सुवासही सुटतो.

Lemon Juice Trick

फर्निचर वॅक्सचा वापर

लाकडी फर्निचरची चमक दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'फर्निचर वॅक्स' (Furniture Wax) अतिशय उपयुक्त ठरते. एका सुती कापडावर थोडे वॅक्स घेऊन ते फर्निचरवर व्यवस्थित घासून घ्या. यामुळे फर्निचर अगदी नव्यासारखे चमकू लागते

Furniture Wax Polish

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: पूजेतील नारळाला तडा गेल्यास काय संकेत मिळतात? शुभ की अशुभ

Meaning of Cracked Coconut During Worship
येथे क्लिक करा...