Siraj No 1 in Test Cricket saam tv
Sports

Ind vs WI Test : नाद करायचा न्हाय! मोहम्मद सिराजचा मोठा कारनामा, ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड, भारतीय गोलंदाजानं करून दाखवलं

Mohammed Siraj Record : ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघातील भल्याभल्यांना जमलं नाही, ते भारताच्या मोहम्मद सिराजनं करून दाखवलंय. कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षात सर्वाधिक विकेट घेऊन नंबर १ गोलंदाज ठरला आहे.

Nandkumar Joshi

  • भारताच्या वाघानं करून दाखवलं

  • मोहम्मद सिराज ठरला नंबर १ गोलंदाज

  • २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान

कसोटीच्या पहिल्या दिवसापासून असलेला वेग, जोश अगदी पाचव्या दिवसांपर्यंत तसाच, विकेट घेण्याची भूक तर जबरदस्त! लाल चेंडू हाती असला की तो मैदानावरचा बादशहाच. खोचक माऱ्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांची दांडी गूल करण्याची जणू सवयच लागलीय. होय मोहम्मद सिराज. भारताचा तेजतर्रार गोलंदाज. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजनं एक जादुई चेंडू फेकला आणि जगातील क्रमांक एकचा गोलंदाज झाला.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघातील गोलंदाजांनाही जमलं नाही, ते भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज यानं करून दाखवलंय. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजीचं कंबरडं मोडून काढणारा सिराज दुसऱ्या कसोटीतही विंडीजच्या फलंदाजांवर तुटून पडला. वेस्ट इंडीजचा शतकवीर शे होप याचा सिराजनं त्रिफळा उडवला आणि जगातील नंबर गोलंदाज होण्याचा मान त्यानं मिळवला. २०२५ या वर्षात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

सिराज आघाडीवर

मोहम्मद सिराजनं शतकवीर शे होपला बाद केलं. होपचा त्रिफळा उडवताच सिराज २०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी याला त्यानं मागे टाकलं आहे. सिराजनं इंग्लंड दौऱ्यातही कमालीची गोलंदाजी केली होती. आता वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबाद आणि नंतर दिल्लीत आपली दंबगगिरी दाखवून दिली आहे.

५१ वर्षांचा दुष्काळ संपला

वेस्ट इंडीजकडून दुसऱ्या डावात २ फलंदाजांनी शतके झळकावली. याआधी जॉन कॅम्पबेल यानं ११५ धावा केल्या. त्यानंतर शे होप यानं शतकी खेळी केली. ५१ वर्षांनंतर वेस्ट इंडीजच्या दोन फलंदाजांनी एकाच डावात भारतात शतक झळकावलं आहे. पण शतक झळकावल्यानंतर या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. ते लगेच बाद झाले. कॅम्पबेलला जडेजानं तंबूत पाठवलं. तर शे होप १०३ धावांवर सिराजच्या चेंडूवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने वेस्ट इंडीजची मधली फळी उद्ध्वस्त करून टाकली. कर्णधार रॉस्टन चेज, टेविन इमलाक आणि खारे पियर यांना त्यानं बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT