ind vs wi 2nd t20i highlights saam tv
क्रीडा

Ind vs Wi 2nd T20I Result: एकटा पुरन टीम इंडियाला उरुन पुरला..सलग दुसऱ्या सामन्यात हार्दिक सेनेचा दारुण पराभव

India vs West Indies Match Highlights: भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 2nd T20I:

वनडे मालिकेत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ टी -२० मालिकेत संघर्ष करताना दिसतोय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागली आहे. दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाने भारतीय संघावर २ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह वेस्टइंडीजने ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.

निकोलस पुरन ठरला विजयाचा हिरो..

भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना एकटा निकोलस पुरन भारतीय गोलंदाजांना उरून पुरला. अवघ्या ४० चेंडूंचा सामना करत पुरनने ६७ धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. तर शिमरन हेटमायरने २२ आणि रोमन पॉवेलने २१ धावांचे योगदान दिले. शेवटी जोसेफ आणि हुसेनने महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली.

या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून एकट्या तिलक वर्माला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्याने ५१ धावांची बहुमूल्य खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला.

भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो...

भारतीय संघातील फलंदाज या डावातही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. सलामीवीर फलंदाज ईशान किशनने २७ धावांची खेळी केली. शुबमन गिलचा फ्लॉप शो काही थांबायचं नाव घेत नाही.

या सामन्यात तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. टी -२० तील नंबर १ चा फलंदाज सूर्यकुमार यादव वेस्टइंडीजच्या गोलंदाजी अटॅकसमोर १ धाव करून नांगी टाकून माघारी परतला. कर्णधार हार्दिक पंड्या २४ तर संजू सॅमसनने अवघ्या ७ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. या पराभवासह भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT