India vs West Indies: भारतीय संघाला वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात तिलक वर्माला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
केवळ या सामन्यात नव्हे तर वेस्टइंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.
भारतीय संघाची फ्लॉप कामगिरी पाहता, भारतीय संघाचं नेमकं गंडतंय तरी कुठं? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
त्रिनिदादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्टइंडीज संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीज संघाने २० षटक अखेर १४९ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. ईशान किशन अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.
तर शुबमन गिलला अवघ्या ३ धावा करता आल्या. भारतीय संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने महत्वपूर्ण खेळी केली. सूर्याने १९ तर तिलक वर्माने ३९ धावांची खेळी केली. (Latest sports updates)
पदार्पणवीर तिलक वर्माने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्मानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने १९ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचे ७७ धावा असताना ४ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या ११३ धावा असताना भारतीय संघाचे केवळ ५ फलंदाज माघारी परतले होते.
भारतीय संघाला उर्वरित ३२ धावा करण्यासाठी ५ विकेट्स गमवाव्या लागल्या. भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचतोय. मात्र विकेट्स सांभाळून ठेवता येत नसल्याने भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागतोय.
मुख्य बाब म्हणजे, ज्या ज्या सामन्यात भारतीय संघाला धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघात नव्हते.
त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा नसले तर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम संतुलित राहणार नाही. अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.