IND vs SL Score 2nd T20I: google
Sports

IND vs SL Score 2nd T20I: भारताचा सलग दुसरा विजय; टीम इंडियाने टी२० मालिकाही घातली खिशात

IND vs SL : आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टी-२० सामना होत आहे. पल्लेकेले येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारताला 78 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

Bharat Jadhav

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-२० सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत १६२ धावांचे आव्हान भारतीय संघाला दिलं. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात भारतीय संघ उतरल्यानंतर वरुणराजाने बॅटिंगला सुरुवात केली. परंतु पावसाने भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद आणला तर लंकेच्या खेळांडूच्या डोळ्यात दु:खाचे अश्रू आणले. पावसामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला. त्यानंतर काही षटके आणि धावसंख्या कमी करण्यात आली. टीम इंडियासमोर नव्यानं ७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आलं. हे आव्हान भारताने ७ विकेट राखत पार केलं.

या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यानंतर फलंदाजांनी संघाला विजयापर्यंत नेले. या मालिका विजयाने सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरचे पर्व सुरू झाल्याची आता सुरू झालीय.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या डावात पहिल्याच षटकात पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर या सामन्यात १२ षटके कमी करण्यात आली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाला ८ षटकात ७८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. पाऊस सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने ३ चेंडूत ६ धावा केल्या होत्या. त्या धावांपासून भारताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती.

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा खूप योग्य ठरला. कारण भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. दुसऱ्या सामन्यातही लंकेच्या फलंदाजीची मधली फळी अपयशी ठरली. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही श्रीलंकेची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे चांगली सुरुवात करूनही संघाला २० षटकात केवळ १६१ धावा करता आल्या.

सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या संघाने फक्त २ गडी गमावत १३० धावासंख्या गाठली होती. इतक्या चांगल्या स्थितीत लंकेचा संघ होता. मात्र अखेरच्या ३१ धावांमध्ये संघाने ७ विकेट गमावल्या. टीम इंडियासाठी रवी बिश्नोई हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २६ धावा देत ३ बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने २-२ विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT