SL vs IND Rain: टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी वरुणराजाची ‘बॅटिंग’; पावसाने वाढवलं श्रीलंकेचं टेन्शन; भारतासमोर आता नवं आव्हान

Sri Lanka vs India 2nd T20I Rain: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी२० सामन्यात पावसाने व्यत्यय आलाय.
SL vs IND Rain: टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी  वरुणराजाची ‘बॅटिंग’; पावसाने वाढवलं श्रीलंकेचं टेन्शन; भारतासमोर आता नवं आव्हान
Sri Lanka vs India 2nd T20I Rain
Published On

श्रीलंकाविरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी २० सामन्यात पावसाने खोडा घातलाय. सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी वरुणराजाने बॅटिंग सुरू केली. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाने पहिले 3 बॉल खेळल्यानंतर पावसाने बॅटिंग सुरू केली.

पाऊस सुरू झाल्याने टीम इंडियाची सलामी जोडी आणि श्रीलंकेचे खेळाडू मैदानाबाहेर गेले. त्यानंतर ग्राउंड्समॅन वेगाने मैदानात येऊन त्यांनी खेळपट्टी झाकली. आता क्रिकेट चाहत्यांना सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? याची प्रतिक्षा लागली. हाती आलेल्या माहितीनुसार डार्क लुईसच्या नियमानुसार, भारतासमोर नवीन आव्हान देण्यात आलंय. सामन्यातील १२ षटके कमी करण्यात शिवाय धावसंख्या कमी करत भारताला विजयासाठी ७८ धावा करण्याचे आव्हान देण्यात आले.

भारताकडून यशस्वी जयस्वाल २४ धावांवर खेळत आहे. तर सूर्यकुमार यादव ६ धावांवर फलंदाजी करत आहे. भारताची पहिली विकेट १२ धावांवर पडली. संजू सॅमसनचे खाते उघडले नाही. यजमान श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी खेळली. भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने तीन बळी घेतले. तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यजमान श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी खेळली. भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने तीन बळी घेतले. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यजमान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात ९ गडी गमावत १६१ धावा केल्या.

SL vs IND Rain: टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी  वरुणराजाची ‘बॅटिंग’; पावसाने वाढवलं श्रीलंकेचं टेन्शन; भारतासमोर आता नवं आव्हान
IND Vs Sl Asia Cup 2024 : श्रीलंकेने रचला इतिहास, भारताला हरवून पहिल्यांदा पटकावलं आशिया कपचं विजेतेपद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com