T20 World Cup IND vs SA Final  Saam Tv
Sports

IND vs SA Final T20 World Cup: अंतिम सामन्यात भारताचा विजय होऊ दे! सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचला चाहता

T20 World Cup IND vs SA Final : टी२० विश्वचषकात भारताने विजेतेपद घ्यावे, यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देव आराधाना सुरू केलीय. सुरुवातीलाच भारतीय संघाला तीन धक्के मिळाले आहेत. निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला.

Bharat Jadhav

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होत आहे. या सामन्याने चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. जेतेपदाच्या लढतीबाबत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. भारताच्या संघाने सामना जिंकवावा यासाठी टीम इंडियाचे चाहत्यांनी सामना सुरू होण्यापूर्वी देवांची आराधना केली.

जेतेपदाच्या लढतीबाबत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. भारताच्या संघाने सामना जिंकवावा यासाठी टीम इंडियाचे चाहत्यांनी सामना सुरू होण्यापूर्वी देवांची आराधना केली. मुंबईतील रोहितच्या चाहत्याने सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जात विघ्नहर्ताची पूजा केली. मुंबईतील चाहत्याने तर रोहितचा फोटो हातात घेऊन सिद्धिविनायकाची पूजा केली.

तर काशी या धार्मिक नगरीत काशीच्या लोकांनी भारताच्या विजयासाठी 'विजय यज्ञ' केला. काशीमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी काशीतील लोकांनी आर्दली बाजार येथील पंचोनवीर बाबा मंदिरात विजय यज्ञ करत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली.

भारतीय संघ ट्रॉफी जिंकेल अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे' टीम इंडिया १३ वर्षांपासून विजेतपदाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान टीम इंडिया तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचलाय. याआधी दोनदा भारतीय संघ अगदी जवळ येऊन इतिहास रचण्यापासून चुकला होता. या कालावधीतील सर्वात हृदयद्रावक पराभव एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये झाला होता.

दरम्यान टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाहीये. आज अखेरचा सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी घेतलीय. सुरुवातीलाच भारतीय संघाला दोन धक्के मिळालेत. निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा काही विशेष कामगिरी करू शकला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

Richest Women Cricketers : सर्वात श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? पहिलं नाव वाचून आश्चर्य वाटेल!

PM, CM ला उडवून देऊ; महाराष्ट्रातील खासदाराची थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांना धमकी

SCROLL FOR NEXT