कोहली आणि ऋतुराज यांची शतकी खेळी व्यर्थ
रायपूर ODI मध्ये भारताचा पराभव
एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये झाला. रायपूरच्या स्टेडिमवरील दुसरा सामन्याने प्रेक्षकांची धकधक वाढवली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अखेर षटकापर्यंत कडवी टक्कर दिली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी शानदार फलंदाजी करत हा सामना जिंकला. एडेन मार्करमची शतकी खेळी, मॅथ्यू ब्रेट्झकेची अर्धशतकी खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा एकदिवसीय सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४ विकेट राखत भारताचा पराभव केला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं बरोबरी केलीय. दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकलेत. टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३५८ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या इतक्या मोठ्या आव्हान दक्षिण आफ्रिकेनं शानदार खेळीनं पार केलं. परदेशात सर्वात मोठी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा पार करत भारतीय संघाला पराभूत केलंय.
दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली, परंतु संघाची धावसंख्या २६ असताना संघाला पहिला धक्का बसला आहे. क्विंटन डी कॉक अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने झेलबाद केला. त्यानंतर टेम्बा बावुमा आणि मार्कराम यांनी सावध फलंदाजी केली पण दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १२७ धावा असताना टेम्बा बावुमा (४६) प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
एडेन मार्करामने आपला दमदार फलंदाजीचा फॉर्म सुरू ठेवला आणि शानदार शतक झळकावले. मार्करामने केवळ ८८ चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. मार्करामचे हे चौथे एकदिवसीय शतक होते. तर भारताविरुद्धचे त्याचे पहिलेच शतक होते. शतक केल्यानंतर मात्र तो जास्त वेळ क्रिजवर राहुल शकला नाही. शतक होताच बाद झाला हर्षित राणाने त्याची विकेट घेतली. ३० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्करमने मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मार्करामने ९८ चेंडूत ११० धावा केल्या.
मार्करम बाद झाल्यानंतर मॅथ्यू ब्रेट्झके आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी जलद धावा काढल्या. त्यांची खेळीनं सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. पण ४१ व्या षटकात कुलदीपनं ही भागीदारी तोडली. त्याने ब्रेव्हिसला झेलबाद केलं. ब्रेव्हिसने ३४ चेंडूत ५४ धावांची धमाकेदार खेळी केली. ब्रेव्हिस बाद झाल्यावर आफ्रिकन संघाचा स्कोअर २८९/४ झाला.
त्यानंतर थोड्याच वेळात प्रसिद्ध कृष्णाने ब्रीट्झकेला ४८ धावांवर एलबीडब्ल्यू पायचीत केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ३१७ धावांवर पाचवा धक्का बसला. त्यानंतर मार्को जॅनसेन देखील लवकर बाद झाला. त्यामुळे आफ्रिकन संघाची धावसंख्या ३२२/६ झाली. जॅनसेनला अर्शदीपने झेलबाद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.