Virat Kohli: व‍िराट कोहलीचा चमत्कारिक षटकार; अख्खा क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा घडलं असं|Video Viral

Virat Kohli Smashes Magical Six: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रायपूर एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने षटकार मारून आपले खाते उघडले. रायपूरमध्ये त्याने वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला षटकार मारून आपलं धावांचे खातं उघडलं. त्याच्या कारकिर्दीतील ही अशी कामगिरी होण्याची दुसरी वेळ आहे.
Virat Kohli Smashes Magical Six:
Virat Kohli hits a brilliant six off Ngidi to open his account in the Raipur ODI, later completing his 53rd century.saam tv
Published On
Summary
  • विराट कोहलीनं रायपूर सामन्यात षटकार मारत आपलं खाते उघडलं.

  • कोहलीनं करिअरमधील ५३ वे एकदिवसीय शतक झळकावलं

  • भारतानं आफ्रिकेसमोर ३६० धावांचे भलंमोठं आव्हान ठेवलं

रांची येथील रायपूरमध्ये भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियाने ३५९ धावा करत आफ्रिकेच्या संघासमोर ३६० धावांचे आव्हान ठेवलंय. धावांचा डोंगर उभारताना कोहलीनं विराट खेळी खेळत सलग दुसरं शतकं केलंय. या दुसऱ्या शतकासह विराट कोहलीनं आपल्या एकदिवसीय क्रिकेटच्या करिअरमधील ५३ वे शतक पूर्ण केलं.

Virat Kohli Smashes Magical Six:
विराटचं Not Attention तर रोहितशी बाचाबाची; कोहलीनंतर रोहित शर्माचं गौतम गंभीरशी बिनसलं? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

त्याचबरोबर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्धात ७वे शतक पूर्ण केलंय. आजच्या सामन्यात फलंदाजीसाठी आल्यानंतर विराट कोहलीनं अद्भूत असा षटकार मारला. असा षटकार त्याने आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा मारलाय. किंग कोहलीने रायपूर एकदिवसीय सामन्यात षटकार मारत आपल्या धावांचे खाते उघडले. त्याने लुंगी एनगिडीच्या चेंडूवर फाइन लेगवर षटकार मारला. विराट कोहलीनं ९३ चेंडूत दोन षटकार आणि सात चौकारांसह १०२ धावा केल्या. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर एडेन मार्करामने त्याला झेलबाद केले.

दरम्यान कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीत षटकार मारून खाते उघडण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. विराटने आधी २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध असा कारनामा केला. तेव्हा कोहलीनं टिनो बेस्टला षटकार ठोकला होता. कोहलीने किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात षटकार मारून आपले खाते उघडले होते. त्यानंतर त्याने बेस्टला डीप बॅकवर्ड पॉइंटने फटका मारत षटकार मारला. त्या सामन्यात ११ धावा काढल्यानंतर कोहलीला डॅरेन सॅमीनं झेलबाद केलं होतं.

Virat Kohli Smashes Magical Six:
Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

रायपूर एकदिवसीय सामन्यात कोहलीने भारतीय डावाच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला.याआधी विराट कोहलीने तीन चेंडू विनाधाव खेळले. कोहलीने एनगिडीच्या १३२ किमी प्रतितास वेगाने फेकलेल्या चेंडूला सीमेरेषे पार परतवून लावला. एनगिडीनं लेग स्टंपच्या लाईनवर टाकला होता. षटकार मारल्यानंतर विराटनं चौकार मारला.

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती षटकार मारलेत?

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६१ षटकार मारलेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट पाचव्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी रोहित शर्मा (३५२), त्यानंतर एमएस धोनी (२२९),तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर (१९५) त्यानंतर सौरव गांगुलीचा नंबर असून त्याने (१९०) षटकार मारलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com