IND vs SA Live Cricket Score 1st Test Day 2 BCCI /X
Sports

Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

Ind vs SA Live Score : भारतीय क्रिकेट संघानं दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला आहे. भारत ऑलआउट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात अवघ्या ७ बाद ९३ धावा केल्या. भारताला विजयाची मोठी संधी असून, तिसऱ्या दिवशीच कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना

  • कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची कमाल

  • दक्षिण आफ्रिकेच्या ७ बाद ९३ धावा

  • अवघ्या ६३ धावांची आघाडी, तिसऱ्या दिवशीच निकाल लागणार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून, दुसऱ्या दिवशी अनपेक्षित खेळ बघायला मिळाला. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा खुर्दा केल्यानंतर पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या मनसुब्यानं मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला १८९ धावांत गुंडाळण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं होतं. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाला आघाडी घेण्याची संधी होती. पण भारतीय फिरकीच्या जाळ्यात पुन्हा अडकले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या ७ बाद ९३ धावा झाल्या असून, अवघ्या ६३ धावांची आघाडी आहे. उर्वरित तीन खेळाडू बाद करून भारतीय संघाला मोठ्या विजयाची संधी आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत अनेक ट्विस्ट बघायला मिळाले. पहिल्या डावात पाहुण्या संघाला अवघ्या १५९ धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. त्यानंतर मैदानात आलेल्या भारतीय फलंदाजांना फार चमकदार कामगिरी करता आली नाही. सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या १२ धावा करून माघारी परतला. तर केएल राहुलला फक्त ३९ धावा करता आल्या.

कर्णधार शुभमन गिल हा अवघ्या चार धावांवर रिटायर्ड आऊट झाला. तर वॉशिंग्टन सुंदरलाही फार काही करता आलं नाही. तो अवघ्या २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत आणि रविंद्र जडेजानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी प्रत्येकी २७ धावा केल्या. ध्रुव जुरेलही १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला अक्षर पटेल यानं फक्त १६ धावा केल्या आणि हार्मरच्या चेंडूवर झेलबाद झाला.

कुलदीप यादव, मोहम्मद सिराज हे दोघेही एक एक धाव करून माघारी परतले. बुमराह नाबाद राहिला. भारताचा डाव १८९ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवशी भारताला गुंडाळून मोठं आव्हान देण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिका संघ कमाल दाखवू शकला नाही. त्यांची सुरुवातच अडखळती झाली. अवघ्या १८ धावा असतानाच रिकल्टन बाद झाला आणि पहिला झटका मिळाला. त्यानंतर संघाला सावरण्यास भारतीय गोलंदाजांनी वेळच दिला नाही. मार्करम अवघ्या ४ धावा करून बाद झाला. मुल्डर हा देखील ११ धावांवर बाद झाला. कर्णधार टेम्बा बवुमानं मैदानात पाय रोवले आहेत. तो २९ धावांवर खेळत आहे. पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणीही साथ दिली नाही. दक्षिण आफ्रिकेचे ७ फलंदाज ९३ धावांवर माघारी परतले आहेत.

दुसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळं लवकरच थांबवला. दक्षिण आफ्रिकेकडं अवघ्या ६३ धावांची आघाडी आहे. बवुमा हा २९ धावांवर खेळत आहे. तर बॉश हा एक धाव करून नाबाद आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांना बाद केलं तर भारताकडे विजयाची संधी असेल. पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मनासारखा दिवस जाणार; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

ऐन निवडणुकीत कारमध्ये सापडली 1,0000000 रुपयांची रोकड; इतकी रक्कम नेमकी कुणाची?

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

Sunday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ५ राशींची होणार भरभराट, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT