suryakumar yadav X
Sports

IND vs SA 3rd T20I: द.आफ्रिकेत सूर्यकुमार चमकला ! या मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Most Sixes In T20I Cricket: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी शतक झळकावलं आहे. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Record News:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी शतक झळकावलं आहे. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तो भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या बाबतीत त्याने विराट कोहलीलाही मागे सोडलं आहे.

भारताचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत १८२ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने या फॉरमॅटमध्ये १२३ षटकार मारले आहेत. तर तिसऱ्या स्त्यानी असलेल्या विराट कोहलीने ११७ षटकार मारले आहेत.

सूर्यकुमार यादवचं वादळी शतक..

या सामन्यात सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत तुफानी शतक झळकावलं आहे. त्याने ५६ चेंडूत १०० धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. हे त्याच्या टी -२० कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. यासह त्याने ४ शतकं झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांची बरोबरी केली आहे. (Suryakumar Yadav Record News)

भारताचा जोरदार विजय..

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ गडी बाद २०१ धावा केल्या. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ६० धावांची आक्रमक खेळी केली. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २०२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर धावांचा बचाव करताना कुलदीप यादव चमकला. त्याने सर्वाधिक ५ गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ९५ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT