team india twitter
क्रीडा

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजने रचला इतिहास! पहिल्याच सेशनमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Mohammed Siraj Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात सिराजने मोठा रेकॉर्ड केला आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test, Mohammed Siraj Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गुडघे टेकताना दिसून आले आहेत. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. दरम्यान ६ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मोहम्मद सिराजच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

मोहम्मद सिराजने सुरुवातीला एडन मार्करमला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर डीन एल्गरला बाद करत दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का दिला. त्यानंतर सिराजने ट्रिस्टन स्ट्रब्स, डी जोरजी, डेव्हिड बेडिंगघम, काईली वेरेयन आणि मार्को यान्सने यांना बाद करत माघारी धाडलं. अशाप्रकारे मोहम्मद सिराजने एकाच सेशनमध्ये ६ फलंदाजांना बाद केलं. यासह एकाच सेशनमध्ये ६ गडी बाद करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

सिराजचं वादळ..

मोहम्मद सिराजसह मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ गडी बाद केले. बुमराहने स्टब्स आणि बर्गरला बाद करत माघारी धाडलं.तर दुसरीकडे मुकेश कुमारने कगिसो रबाडा आणि केशव महाराजला बाद केलं. सिराजने एडन मार्करम, डीन एल्गर, डोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्ट्ब्स, डेविड बेडिंगघम, काइली वेरेयन आणि मार्को यान्सेन यांना बाद करत माघारी धाडलं. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर संपुष्टात..

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना टीचून फलंदाजी करता आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT